अकोले (दि. १९ मे २०२५) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्य बळकट करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभुळवंडी (ता. अकोले) येथील श्री. सुनिल भाऊराव लोखंडे यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.महेबूब शेख यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष श्री.अमित अशोक भांगरे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे आणि पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
सुनिल लोखंडे यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, आगामी काळात संघटन बळकट करण्यासाठी त्यांचे योगदान उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
श्री. सुनिल लोखंडे यांचे तर्फे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
