पुन्य वार्ता
अकोले/प्रतिनिधी-
प्रत्येक मूल शिकले पाहिजे,त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहीजे.शिक्षकांनी नवनवीन विचारप्रवाह,विषयज्ञान अदययावत असणे आवश्यक आहे.त्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता असतेच त्याची वृद्धी व्हावी त्यासाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण असल्याचे विचार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी प्रतिपादन केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,संगमनेर जिल्हा अहिल्यानगर व शिक्षण विभाग पंचायत समिती अकोले आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी २.० तालुकास्तरीय प्रशिक्षण अगस्ती महाविद्यालय अकोले येथे संपन्न झाले.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत विचारमंचावरून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.भास्कर शेळके हे होते.या प्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी माधव हासे,समन्वयक प्रशिक्षक गणेश घोलप, गटसाधन योगेश कुऱ्हाडे,विलास पठाडे,प्राचार्य सुनिल धुमाळ,भाऊसाहेब बनकर, राजेंद्र सोनवणे,मधुकर मोखरे,पर्यवेक्षक विवेक वाकचौरे यांसह सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी पुढे मार्गदर्शन करताना ताणतणाव दुर करा.सकारात्मक विचार घ्या.जबाबदारी समर्थपणे पार पाडा.नविन संकल्पना शोधा.त्यातुनच शिक्षणविभागाचा स्तर उंचावतो. वर्गातील विद्यार्थी हे आपले मुले समजून ज्ञानदान करा.असे विचार व्यक्त केले.
समन्वयक गणेश शिंदे यांनी जिवनात अडचणी येतच रहाणार. त्या अडचणींवर मात करून पुढे जायचे आहे.आपल्यासाठी,विदयार्थ्यासाठी, शाळेसाठी प्रशिक्षणाचा वापर करा. त्यातूनच शैक्षणिक क्षमता वृद्धी करा असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असतात ती सांगणे व जाणीव करून देण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.आपण शेवटपर्यंत शिक्षक असले पाहीजे.देण्यातला आनंद महत्त्वाचा असून राष्ट्रासाठी,मुलांसाठी ही भावना चिरकाल टिकावी हीच खरी प्रशिक्षणाची व्याप्ती असल्याचे विचार व्यक्त केले.
यावेळी निता देशमुख,दीपक जोंधळे, सी.एम. सहाणे, संतराम बारवकर आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पाचपुते यांनी केले.
सुत्रसंचलन डॉ.नितीन आरोटे यांनी केले तर उपप्राचार्य चांगदेव डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रशिक्षणादरम्यान सुलभक चंद्रशेखर हासे,एस.एस.बिराजदार, हौशिराम खताळ, सुनिल टिक्कल,संतराम बारवकर,अर्जुन तळपाडे,विक्रम आंबरे,तुकाराम चव्हाण,संजय पवार आदींनी मार्गदर्शन केले.


