पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
216 अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार गट) या दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय अटीतटीची लढाई झाली.
या लढाईत अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांचा विजय झाला 5556 मतांच्या फरकाने त्यांनी शरदचंद्र पवार गटाचे अमित भांगरे यांचा पराभव केला. भाजपचे वैभवराव पिचड यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली त्यांना या निवडणुकीत 32,783 इतकी मते घेत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमित भांगरे हे पहिल्या फेरीपासून पुढे राहिले, यामुळे सकाळ पासून किरण लहामटे यांच्या समर्थकांत शांतता होती.मात्र सहाव्या फेरी नंतर डॉ.किरण लहामटे यांनी सातत्याने आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवून
5556 मतांनी महायुतीचे डॉ. लहामटे यांनी महाविकास आघाडीचे अमित भांगरे यांच्यावर विजय मिळविला.अमित भांगरे यांना 68402 तर विजयी डॉ. किरण लहामटे यांना 72958 मते मिळाली.आ.
डॉ. लहामटे यांना मिळाली लहामटे यांना एकूण73,958 मते मिळाली तर अमित भांगरे याना 68,402 मते मिळाली.टपाली मतदान धरून
5556 मतांच्या फरकाने आ.डॉ. किरण लहामटे हे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे
32783 मते मिळवत अपक्ष उमेदवार वैभव पिचड हे तिसऱ्या क्रमांकावर गेले तर शेवटपर्यंत विजयाचा दावा करणारे अपक्ष उमेदवार मधुकर तळपडे यांना अवघे 1747 मत मिळाले तर मारुती मेंगाळ यांना 10830 मते मिळाली
इतर अपक्ष उमेदवार पांडुरंग पथवे यांना 2777
भिवा घाणे यांना 446 किसन पथवे यांना 387 विलास घोडे यांना 1457 मते मिळाली
या निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार उभे होते या नऊपैकी एकही उमेदवार पसंत नाही अशा नोटा च्या बाजूने 2802 मतदारांनी मते टाकली.
डॉ.किरण लहामटे यांचा विजय झाल्यानंतर अगस्ति विद्यालयाच्या प्रांगणात मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला.


