पुण्य वार्ता
प्रतिनिधी:-श्री दत्तू जाधव
तालुक्यातील अंबड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ सुरेखा हासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी एक महिना अगोदर सरपंच सौ रेश्मा कानवडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा गट विकास अधिकारी विकास चौरे यांचेकडे सुपूर्त केला होता त्यांनी तो मंजूर देखील केला होता त्यामुळे प्रभारी म्हणून सरपंच पदाचा कार्यकाल उपसरपंच श्री नाथा भोर यांचेकडे देण्यात आला होता त्यानंतर राजीनाम्याची पडताळणी होऊन प्रशासकीय नियमाप्रमाणे आज 26/11/2024 रोजी सरपंच निवडीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला व सर्वसाधारण स्त्री राखीव असलेल्या सरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने सौ.सुरेखा रामचंद्र हासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या नावाची सूचना श्री संदीप जाधव यांनी मांडली व त्यास अनुमोदक श्री नाथा भोर यांनी दिले निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी श्री बाबासाहेब दातखीळे व तलाठी श्री प्रवीण ढोले यांनी तर सहाय्यक अधिकारी म्हणून ग्रामसेवक कु.ए.के. शेलार यांनी काम पाहिले
सदर निवडीबद्दल शिवसेना पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भास्कर भोर प्रसिद्ध प्रमुख दत्तू जाधव गावचे जेष्ठ नेते गिरजाजी जाधव भागवतराव भोर पोलिस पाटील भाऊसाहेब कानवडे एक डी सी सी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी माधवराव भोर भास्कर कानवडे सर दुध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब जाधव सर व्हाईसचेअरमन माधव भोर सोसायटीचे चेअरमन परिक्षीत भोर संपत जाधव शिवराम भोर सर सुधीर कानवडे सर व्हाईसचेअरमन कैलास कानवडे केशवराव मालुंजकर माधवराव भोर तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळचंद भोर उपाध्यक्ष मधुकर भोर कळस गावचे ग्रामविकास अधिकारी कचरू भोर संदिप जाधव किसन भोर संदिप भोर रमेश जाधव तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे
