पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)-
सर्व धर्मानुरागी भावीकांच्या सहकार्याने प्रभु श्रीरामचंद्राच्या दंडकारण्यामध्ये महर्षी अगस्ति मुनी, राजा हरीश्चंद्र व छत्रपती शिवाजी महाराज आणि महालक्ष्मी माता यांच्या कृपार्शीवादाने अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळगाव नाकविंदा येथे श्री महालक्ष्मी माता नवरात्रोत्सवा निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन केले आहे.
यानिमित्ताने काकडा,अभिषेक आरती,पारायण,किर्तन व नंतर महाप्रसाद आदि विधींचे आयोजन केले आहे.
गुरूवार दि.३/१०/२०२४ रोजी ह.भ.प.योगेश महाराज धात्रक(त्र्यंबकेश्वर),शुक्रवार दि.४/१०/२०२४ रोजी ह.भ.प.पल्लवीताई तोरमल(पिंपळगाव निपाणी),शनिवार दि.५/१०/२०२४ रोजी ह.भ.प.भास्कर महाराज गव्हाण(अंजनापूर),रविवार दि.६/१०/२०२४ ह.भ.प.नेहाताई भोसले(पुणे),सोमवार दि.७/१०/२०२४ ह.भ.प. कान्होपात्राताई सोमासे(आश्वी), मंगळवार दि.८/१०/२०२४ ह.भ.प.इंद्रजीत महाराज रसाळ(बीड),बुधवार दि.९/१०/२०२४ ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर(अ.नगर),गुरूवार दि.१०/१०/२०२४ ह.भ.प.सागर महाराज दिंडे(नाशिक) यांचे किर्तन तसेच शुक्रवार दि.११/१०/२०२४ रोजी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे(गेवराई(बीड) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.या उत्सवामध्ये सर्व दिवशी अन्नदानाचे आयोजन केले आहे.यासाठी परिसरातील सर्व भाविकांनी या अमृतमय उत्सवाचा लाभ घ्यावा.असे पिंपळगाव नाकविंदा येथील ग्रामस्थ,तरूण मित्रमंडळ, महिला भगिनी,भजनी मंडळ आदींनी अवहान केले आहे.




