पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):-
आषाढी एकादशीला वारकरी,भविकभक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात.याचेच औचित्य साधत एकदरे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी दिंडी काढली.विठ्ठल-रुक्मिणी ची वेशभूषा व वारकऱ्यांची वेशभूषा करणारे विद्यार्थी ठरले विशेष आकर्षण.
या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध अभंग,गौळण,भावगीते व भक्ती गीतांवर नृत्य सादर केले.टाळ, मृदंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी भजन सादर केले.विद्यार्थिनींनी टाळ-मृदंगाच्या तालावर फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.शाळेपासून चंदगीरवाडी च्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पर्यंत पायी दिंडी काढण्यात आले.मंदिरात विठुरायचे दर्शन घेत,उपस्थितांना समोर माऊली माऊली,मला जायचे पंढरपूर या गाण्यांवर नृत्य सादर केले,हरिपाठ म्हणत विद्यार्थी पाऊली खेळले.पंढरपूर ला न जाताही विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेऊन पांडुरंगाचे दर्शन लाभल्याने विद्यार्थी आनंदीत झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रम आरोटे,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रल्हाद नेहे,साहेबराब वाकचौरे,जालिंदर कराळे, आसाराम कानकाटे,अनिल नवले,ललित छल्लारे,दत्ता जाधव,अधीक्षक विरेंद्र शिंदे,लक्ष्मण कुसळकर,लक्ष्मण चंदगिर,श्रीमती नंदा वाकचौरे, उर्मिला शेळके, मनिषा धिंदळे, अधीक्षका वर्षा सोनवणे आदींसह विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

