पुण्य वार्ता
अकोले
जिल्हा परिषदेने इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ हा उपक्रम सुरू केला आहे त्याची पहिली सराव परीक्षा सराव परीक्षा २८ जून रोजी झाली सदर सराव परीक्षेचे पेपर पालकांना पाहण्यासाठी शनिवारी पाच जुलै रोजी उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे खऱ्या अर्थाने या उपक्रमात शिक्षण पालकांनाही दक्ष करून गुणवत्तेसाठी कंबर कसली आहे
- मिशन आरंभ उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी पहिली सराव चाचणी दिनांक 28 जून रोजी घेण्यात आली सदर परीक्षेचा निकाल नुकताच शिक्षकांनी शाळा स्तरावर जाहीर केला शाळा स्तरावर घेतलेल्या परीक्षेचा परीक्षेचे पेपर पालक मेळावा घेऊन पालकांना उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी दिलेहोते त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शाळांनी पालक मेळावा घेऊन मिशन* आरंभांतर्गत घेतलेल्या परीक्षेचे पेपर पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे पालकांनाही जूनच्या पहिल्या आठवड्यात आश्चर्याचा धक्का बसला आहे या उपक्रमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तेत कोणत्याही प्रकारचीतडजोड केली जाणार नाही असा संदेशच शिक्षण विभागाने दिला आहे
भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेतही पालकांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे आपल्या पाल्याची प्रगती करण्यासाठी पेपर पडताळणी उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे त्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची पालकांना माहिती व्हावी या हेतूने शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रेरणेने सदर गुणवत्ता वाढीचा उपक्रम अधिक जोमाने पुढे सुरू राहणार आहे तालुक्यातील शाळांनी शाळांनी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे
त्यांना मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत मिशन आरंभ चे नोडल अधिकारी बाळासाहेब दोरगे विस्ताराधिकारी माधव हासे अनिल गायकवाड संभाजी झावरे सविता कचरे एकनाथ भांगरे यांचे सह सर्व केंद्रप्रमुख करत आहे.
——–
मिशन आरंभांतर्गत इयत्ता तिसरी ते आठवीच्या सराव परीक्षांचे विद्यार्थ्यांचे पेपर पालकांना उपलब्ध करून दिल्यामुळे पाल्याची प्रगती करण्यासाठी पालकांचे उत्तम सहकार्य मिळेल मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा हा उपक्रम उपयोगी ठरत आहे
अरविंद कुमावत
गट शिक्षणाधिकारी अकोले

