पुन्य वार्ता
निघोज [ पारनेर वृत्तसेवा ] – विघ्नहर्ता सहकारी पतसंस्था मळगंगा मातेच्या पवित्र भूमीमध्ये चेअरमन सुभाष रामचंद्र साठे यांनी दि . २२ ऑगस्ट २०२४ मध्ये स्थापन केली .आज ही खऱ्या अर्थाने नावारूपाला आली आहे .
सहकारी क्षेत्रात आदर्श व्यक्ती महत्त्व असणारे निघोज ग्रामीण पतसंस्थेचे दिवंगत चेअरमन बाबासाहेब कवाद यांच्या मुळे सुभाषराव साठे यांना सहकारात २५ वर्षे काम करण्याची संधी लाभली , दिवंगत कवाद यांच्या बरोबर काम करताना त्यांचे विचार सातत्याने आचरणात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला व करत आहे . संस्था स्थापनेपासून कोरोना महामारी , नोटाबंदी , नैसर्गिक आपत्ती सारखे अस्मानी संकटे आली असताना ही सर्वसामान्यांनी संस्थेवर विश्वास ठेवला , त्यामुळे संस्था प्रगती पथावर आहे . संस्थेचे मुख्य कार्यालय निघोज येथे असून व जवळा , शिरूर , शिक्रापूर या ३ शाखांच्या माध्यमातून कामकाज योग्य रितीने सुरू असल्याने संस्था पारनेर व शिरूर तालुक्यात नावारूपाला आली आहे .
चेअरमन साठे व सर्व संचालक एकत्रित समविचाराने काम करत असल्याने संस्थेने नावलौकिक मिळविला आहे . त्यामुळेच चेअरमन साठे यांनी २२ ऑगस्ट २०२० मध्ये म्हणजे अवघ्या चार वर्षापूर्वी विघ्नहर्ता पतसंस्थेचे इवलेसे रोपटे लावले , त्याचे वटवृक्षाच्या रुपांतर होताना पाहायला मिळत आहे .
दि .३१ मार्च २०२४ रोजी संस्थेकडे ८७ लाख २९ हजार रुपये भागभांडवल असून ठेवी ३२ कोटी ५४ लाख रुपये , तर २१ कोटी ९० लाख रुपयांचे तारण कर्ज वाटण्यात आली आहेत . गुंतवणूक ११ कोटी ७० लाख रुपयांची व निधी २९ लाख ७३ हजार रुपये आहे .
या विघ्नहर्ता पतसंस्थेची ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि . २९ रोजी संस्थेच्या शिरूर शाखेच्या सभागृहात सकाळी ९ . ३० वाजता चेअरमन सुभाषराव साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे .
[ चौकट –
आजच्या परिस्थिती चा विचार करता , सहकार क्षेत्रात काम करणे , म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे . संस्था स्थापन करून चालविणे जिकिरीचे झाले आहे . अश्या परिस्थित चेअरमन सुभाषराव साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निघोज सारख्या ग्रामीण भागात विघ्नहर्ता सहकारी पतसंस्था स्थापन करून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार तर दिलाच , त्याबरोबरच अनेक गरजूंना कर्ज रूपाने आर्थिक मदत देवून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे महान कार्य केले आहे . ]
