पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी — वंदनीय पिचड साहेबांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने माझी निवडणूक लढण्याची माणसीकता नव्हती द्विधा मनस्थितीत होतो त्यावेळी पिचड साहेबांचे जुने कार्यकर्ते मित्र यांनी मला फोन करुन “पिचड साहेब रडणारा नाही.. लढणारा आहे.. तेव्हा तु लढ ” अशी भुमिका दिली व माय बाप जनतेनेच आपला अर्ज भरला असुन साहेबांच्या आशिर्वादाने निवडणूक लढवत आहे उद्या साहेब बरे होऊन राजुरला आल्यावर त्यांना चांगला योग्य संदेश भेटेल व निवडणूकीत निर्णय साहेबांच्या तब्बेतीला उर्जा व दिलासा देणारा असावा असे अवाहन करताना मा.आ.वैभवराव पिचडांना आश्रु आनावर होउन भावुक झाले होते.
आज सकाळी अकोले येथील अगस्ती आश्रमात अकोले विधानसभा निवडणूकित अपक्ष उमेदवार मा.आ.वैभवराव पिचड यांच्या प्रचाराचा नारळ वाहण्यात आला यावेळी मा.आ.पिचड बोलत होते याप्रसंगी त्याची पत्नी साै. पिचड,मुलगी डॅा.मधुरा पिचड,मुलगा चि.यश पिचड ,जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ,नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,उपनगराध्यक्ष शरद नवले,रावसाहेब वाकचाैरे,सुनिल दातीर,यशवंतराव आभाळे,सुधाकर देशमुख, अरुण शेळके,राहुल बेनके,राहुल देशमुख,सोमनाथ मेंगाळ,, आनंदराव वाकचाैरे, अप्पासाहेब आवारी,राजुपाटील देशमुख, सीताराम देशमुख,कविराज भांगरे,गंगाधर नाईकवाडी,माजी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, नगरसेविका शितल वैद्य,तमन्ना शेख,परशराम शेळके,मोहसिन शेख,सागर चाैधरी, बाळासाहेब सावंत,सोमनाथ नवले सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोले शहरातील संपर्क कार्यालयापासुन मा.आ.पिचड त्याचे निवडणूक चिन्ह असलेल्या ॲटो रिक्षातून रॅलीने कार्यकर्त्यासह अगस्ती मंदिरात आले यावेळी सपत्नीक अगस्ती महराजांची पूजा करुन नारळ वाहण्यात आला.यावेळी कार्यकर्त्याना संबोधित करताना पिचड म्हणाले कि वंदनीय पिचड साहेबांनी दूरदृष्टीने हा तालुका सुजलाम सुफलाम् केला आहे साहेबांनी पाण्याचे अतुलनिय असे काम केले आहे आज साहेबांनी निर्माण केलेली धरणे,बंधारे,केटिवेअर नसती अथवा ति वजा केली तर काय अवस्था असती.तालुका बांधण्याचे काम साहेबांनी केले.आपल्याला आज अपक्ष अर्ज भरण्याची वेळ आली तुम्हाला माहित आहे आपण पक्षाकडे तिकिट मागितले होते मिळाले नाही परंतु काहि हरकत नाही परिक्षा घेणारी हि माय बाप जनता आहे आणि हि जनता राजाला रंक व भिका-याला राजा बनवू शकते या माय बाप जनतेनेच आपला अपक्ष अर्ज भरला आहे त्यामुळे जनतेने निर्णय घेतला आहे व तो निर्णय आपल्या बाजूनेच आहे असा विश्वास आहे.
निवडणूक अर्ज भरण्यावेळी साहेब रुग्णालयात असल्याने मला वेळ देता येणार नाही याने माझे मन मला खात होते त्यामुळे मी माघारीचा अर्ज पाठवला होता.मात्र या माय बाप जनतेने कार्यकर्त्यानी माघारी अर्ज फाडून माझी उमेदवारी कायम ठेवली या जनतेच्या प्रेमाने मला येथे ओढून आणले आहे परंतु माझे मन अजून रुग्णालयात साहेबांच्या तब्बेतीकडे लागलेले आहे.साहेबांवर उपचारासाठी डॅाक्टरांचे प्रयत्न सुरु आहे.पुढे मी प्रचारात येईल कि नाही किती वेळ देऊ शकेल हे सांगता येत नाही मात्र हि निवडणूक जनतेने हातात घेतली आहे व माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे आज पिचड साहेबांनी घडविलेले हाडाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रात योगदान देणारी उभी केलेली माणसे आज साहेब आजारी असल्याने मला साथ देण्यासाठी उभी राहत आहे आज कैलास भाऊ वाकचाैरे ,बाळासाहेब नाईकवाडी,गोरख मालुंजकर, प्रतापतात्या देशमुख आदिनी पाठिबा दिला आहे तर अनेक कार्यकर्त्यानी फोनवर चर्चा केली आहे येत्या काहि दिवसांत अनेक कार्यकर्ते पाठिंबा देणार असल्याचा दावाही पिचड यांनी केला.

चाैकट
अकोलेत महायुतीला खिंडार…आ.लहामटेचे टेंन्शन वाढले
विधानसभा निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असुन राष्ट्रवादी कॅाग्रेस (अजित पवार) गटाचे नेते मा.जि.प.सदस्य कैलासराव वाकचाैरे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यासह आ.लहामटे यांची अर्थात महायुतीची साथ सोडत आज अपक्ष उमेदवार मा.आ.वैभवराव पिचड यांना पाठिंबा दिला आहे त्याचेसोबत राष्ट्रवादीचे अमृतसागर दुध संघाचे संचालक गोरक्ष मालुंजकर हे हि आहेत.

