पुण्य वार्ता
विरगाव(ज्ञानेश्वर खुळे)--
------------------
अकोले तालुक्यातील विरगाव येथील उदयोन्मुख गायक संदीप नारायण गोरे (वय 30 वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.कलासक्त आणि कलारसिक असणा-या संदीप गोरे यांची गायनात वेगळी छाप होती.त्यांचे निधनामुळे विरगाव गावावर ऐन बैलपोळ्याच्या दिवशी शोककळा पसरली.
आजोबा स्व.मुरलीधर गोरे, वडील स्व. नारायण गोरे यांचे परंपरेचा कला प्रवाह संदीपने वाहता ठेवला होता.महाराष्ट्रातील कला प्रांतात गायकीच्या माध्यमातून तो सर्वदूर परिचित होता.त्याचे पश्चात आई,पत्नी,भाऊ,भावजयी,मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.