पुण्यवार्ता
प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव) संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावचे सुपुत्र कैलास कोते यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार तसेच क्रीडा शिक्षक सचिव पदी निवड झाली व गावचे दुसरे सुपूत्र मंगेश कडलग सर यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी एज्युकेशन पदवी मिळाली त्याबद्दल जवळेकडलग ग्रामस्थ दत्त विद्यालय जवळेकडलग मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व संस्थेचे पदाधिकारी यांच्यावतीने वतीने
दत्त विद्यालयाच्या प्रांगणात गुण गौरव समारंभ संपन्न झाला यावेळी मैदानी खेळाच्या विषयावर कैलास कोते यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले शिक्षण विकास या संदर्भात मंगेश कडलग सर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले
या कार्यक्रमासाठी प्रा गाडेकर सर चौधरी सर मांडे सर वाकचौरे सर प्रसाद कडलग ह भ प रोहिदास महाराज कडलग किरण सुर्वे दत्ता कडलग महेश पवार व ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


