अकोले प्रतिनिधीं
देवठाण आढळा धरणाच्या ओलिताखाली असलेल्या 16 गावांचा रब्बी हंगामाचा प्रश्न सुटला असुन आढळा माईचा पाणी पुजन व दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यासाठी गावातील ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाचे सर्व सदस्य, हिवरगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हा. चेअरमन सर्व संचालक,ग्रामस्थ, महिला भगिनी, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व स्टाप सर्व विद्यार्थी उपस्थित होते.तसेच न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंबरे शाळेचे मुख्याध्यापक त्यांचा सर्व स्टाप व विद्यार्थी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


