गणोरे – वृत्तसेवा
अकोले तालुक्यातील गणोरे येथील वसंत आंबरे व सौ. ताराबाई वसंत आंबरे यांचे चिरंजीव “प्रदिप वसंत आंबरे” याने एम पी एस सी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षेत सहासे विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मिळवत सहाय्यक आयुक्त ( अन्न ) (Assistant Commissioner of Food)’ या राजपत्रित Class-1 पदी राज्यातून प्रथम क्रमांकाने निवड झाली.
प्रदिप चे इयत्ता १० वी पर्यंत माध्यमिक शिक्षण गणोरे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात तर त्यापुढील ११ वी १२ वी चे शिक्षण संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयात झाले, नंतर बीड येथे बी टेक ची पदवी घेतली. राहुरी कृषी विद्यापीठात एम टेक ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याच्या अभ्यासातील प्रगतीमुळे त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदावरील परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, आई विडी कामगार तर वडील शेती करून प्रपंच पुढे नेत होते. परिस्थितीची जाणीव असलेल्या प्रदिप अहोरात्र अभ्यासात गर्क होता. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. २०२३ मध्ये ही पुर्व परिक्षा देऊन १० फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य परीक्षा झाली. या परीक्षेसाठी तब्बल ३००० विद्यार्थी बसले होते. यामध्ये सहाशे विद्यार्थी पास झाले. सहासे विद्यार्थ्यांच्या मुलाखतीमधुन त्याची
मंगळवार दि. २१ जानेवारी ला जाहीर झालेल्या निकालात प्रथम क्रमांक मिळवुन प्रदिप सहाय्यक आयुक्त (अन्न) क्लासवन अधिकारी झाला, प्रदिपने अत्यंत खडतर परिस्थितीत मार्गक्रमण करीत शेवटी आपल्या ध्येयाला गवसणी घातली, आजच्या अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांना त्याने एक आदर्श घालून दिला आहे.आपले ध्येय निश्चित करून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास आपण इच्छित यश निश्चित प्राप्त करू शकतो, त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवावे असे आवाहन गरजू व अभ्यासू विदयार्थ्यांना त्याने केले आहे.त्याच्या या खडतर प्रवासात माध्यमिक शाळेत शिक्षक दिघे एन डी आणि महाविद्यालयीन शिक्षणात प्रा.शाम भुतडा यांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रदिप सांगतो, तर यात त्याची बहिण व आई वडिलांचे अपार कष्ट विसरता येणार नाहीत प्रदिप च्या यशा बद्दल तालुक्यातुन कौतुक होत असुन त्याचे गणोरे येथील विविध सहकारी संस्थानी व तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी अभिनंदन केले आहे.

