पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- केंद्र सरकारच्या 100 टक्के निधी असलेल्या 79000 कोटी रुपये निधी मधून अकोले तालुक्यातील विशेषतः आदीवासी भागातील पर्यटन, रस्ते,तीर्थक्षेत्र, पाणी,गाव जोडरस्ते,रेल्वे मार्ग,पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविणे,बीताका वळचन प्रकल्प,श्रीराम कोरोडियर, युवकांना रोजगार,नाशिक,ठाणे, पुणे जिल्ह्याच्या सीमारेषा जवळ करण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी, ग्रामसभेने,व समाजाने प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार करून त्याचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
त्यांनी गुरुवारी सकाळी ९वाजल्यापासून आदिवासी भागातील दौरा केला असून त्यामध्ये अकोले तालुक्यातील रतनवाडी,घाटघर,रंधा,कोदणी,परिसरातील पर्यटन, तीर्थक्षेत्राची पाहणी करून चोंढे घाटघर रस्ता पाहणी करून स्थानिक ग्रामस्थांच्या प्रश्नांची उकल केली ,यावेळी त्यांच्यासमवेत दिल्ली येथून आलेले केंद्रीय पथकाचे राजकुमार कश्यप ASO , ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनचे निष्कर्ष बरेजा, सुरेशचंद्र शर्मा दिल्ली ,गंगाधरराव चिन्ही, दिल्ली ,सिद्धार्थ कपूर, मच्छीन्द्र धुमाळ, महेश नवले,प्रमोद मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप भांगरे,
संतोष मुतडक,वन्य जीव विभागाचे वन क्षेत्रपाल डी.डी.पडवळ,श्रीमती सोनवने,वनक्षेत्रपाल गावित ,दगडू पाटील पांढरे,संपत झडे,अमोल बोऱ्हाडे, श्री. पवार,हे उपस्थित होते .
तर अकोले येथे शासकीय विश्राम गृह येथे डॉ.अजित नवले,विठ्ठलराव शेवाळे,प्रदीप हासे, तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे,प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, गट विकास अधिकारी श्री माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,अमोल बोऱ्हाडे, श्री. पवार,हे उपस्थित होते .
पश्चिमेकडील वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवणार-
कोकणात वाहून जाणारे पाणी हिवरा नाला येथे धरण बांधून पाणी अडविणार तसेच बीताका वळचन प्रकल्प मार्गी लावणार आहे तसेच क्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशयतील गाळ काढून त्याची पाणी साठा वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हे जोड रस्ते तयार करणार
ठाणे,पुणे नाशिक जिल्ह्याला जोडणारे रस्ते तयार करायचे असून तोलारखिंड व चोंढे घाट यासाठी उपस्थित अधिकारी यांना तातडीने याबाबत पाऊले उचलून मला याचा सविस्तर अहवाल द्यावा मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावतो असे स्पष्ट केले.
तीर्थक्षेत्र विकास व श्रीराम कोरोडियर करणार-
रतनवाडी ,हरिश्चंद्रगड येथील मंदिराची पुरातत्व विभागाचे वरिष्ठांना दिल्ली येथे जाऊन त्यासाठी निधी उपलब्धता करून देईल तसेच त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. असे खासदार वाकचौरे म्हणाले .तर हरिश्चंद्र गड,टाहाकरी,तातोबा मंदिर,अगस्ती आश्रम, तेरूगण हे आश्रम श्रीराम सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून देशात श्रीराम मंदिर उभारणीचा जल्लोष होत असताना ही मंदिरे दुर्लक्षित राहू नये म्हणून या तिर्थक्षेत्राचे चित्रण करून मा .पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यासाठी केंद्राचा निधी उपलब्ध करून श्रीराम कोरोडियर करून तीर्थ क्षेत्राचा विकास केला जाईल.
प्रति काश्मीर उभे करणार-
भंडारदरा घाटघर हे निसर्ग रम्य ठिकाण काश्मीर ,महाबळेश्वर इतकेच महत्वाचे असून या भागाला प्रति काश्मीर करण्याबाबत केंद्रीय मंत्री यांना भेटून पर्यटन विकास होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले .रतनवाडी येथील भवना साठी मोठा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले .तसेच कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणार असून कळसुबाई शिखरावर रोपवे ही करणार असल्याचे तालुक्यातील 12 किल्ल्यांचा विकास करून पर्यटन विकासाला चालना देणार असल्याचे सांगितले .वन्य जीव विभागाचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून वन्य जीव संवर्धन करण्यासाठी अधिकारी वर्गाने सतर्क राहून निधीसाठी माझेकडे प्रस्ताव द्यावा असे वाकचौरे यांनी सांगून पुढील आठवड्यात हरिश्चंद्र गड येथील सर्व्हे साठी अधिकारी व मी स्वतः येणार आहे असे सांगितले.आढळा परिसरात चेमदेव परिसर हा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार असल्याचे त्यानी सांगितले.
हिरडा,मधूमक्षिपालन, वनौषधी साठी प्राध्यान्य-
663 प्रजाती वनऔषधी ला प्राधान्य, हिरडा खरेदी विक्री केंद्र सुरू करणे,मधूमक्षिपालन याच्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले.
आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पर्जन्यमान मोजण्यासाठी साठी यंत्रणा उभी करावी लागेल त्याचा फायदा नुकसान भरपाई पंचनामे करण्यासाठी उपयोग होईल असे सांगितले.
पुणे नाशिक रेल्वे मार्ग-
पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी मी प्रयत्नशील असून हा प्रस्ताव मीच 2009 साली मंजूर करून घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जाचक अटी रद्द करणार-
इको झोन,गावागावाला जोडणारे रस्ते तयार करायचे आहेत,तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्यांना जमीन नाही त्यांच्यासाठी शासन स्तरावर गावठाण जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून घरकुलाला मिळणारी रक्कम 1,20,000/- ही अतिशय कमी असून ती 250000/- रुपये व्हावी या साठी प्रयत्न करणार आहे. यासाठी च्या जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
प्रत्येक गावाचा विकास आराखडा-
गावोगावी ग्रामसभा प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणार असून प्रत्येक गावाचा विकास आराखडा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी समाजातून योग्य सूचना व प्रस्ताव तयार करण्यासाठी अधिकारी वर्गाला सहकार्य करण्यासाठी एक कमिटी नेमणार असल्याचे सांगितले.
