पुन्य वार्ता
डोंगरगाव समर्थ गावकरी
माळशेज नागरी सहकारी पतसंस्था ठाणे,गणोरे शाखेच्या वतीने नवनियुक्त चेअरमन व्हा चेअरमन, संचालक मंडळाचा तसेच गणोरे येथील प्रदीप वसंत आंबरे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून सहायक आयुक्त अन्न या वर्ग एक या राजपत्रित अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थंचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.चंद्रकांत महाराज डुंबरे हे होते.आयुक्त प्रदीप आंबरे यांचा संचालक मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच नवनियुक्त चेअरमन,व्हा चेअरमन ,संचालक मंडळाचा नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी माजी सरपंच बाबासाहेब उगले,शेतकरी नेते शुभम आंबरे,माजी पंचायत समिती सभापती अंजनाताई बोंबले,ग्रामसुरक्षा यंत्रनेचे सर्वसर्वा डी के गोर्डे, विश्व हायटेक नर्सरी चे सर्वेसर्वा वीरेंद्र थोरात,आयुक्त प्रदीप आंबरे याची मनोगते झाली.तसेच अध्यक्षीय भाषणात ह.भ.प चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी संस्थेबद्दल नवनियुक्त संचालक मंडळाला मार्गदर्शन केले.
यावेळी गणोरे शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र नानासाहेब थोरात,उपाध्यक्ष उषाताई रामदास शिंदे,सदस्य मंडळ डी के गोर्डे,नानासाहेब चिमणाजी वाकचौरे,अंजनाताई बाजीराव बोंबले,राजाराम शिवराम वाकचौरे,बाबासाहेब बाळासाहेब उगले,डॉ रेवणनाथ गणपत वाकचौरे,केशव रामचंद्र चौधरी,अशोक कारभारी उगले,भाऊसाहेब पांडुरंग नाईकवाडी,केशव रामचंद्र मोरे,शुभम किसन आंबरे,मोहन मारुती दातीर,राजेंद्र आनंदराव भांगरे,बाळासाहेब भानुदास मोरे,गुरुप्रसाद राधाकिसन रेवगडे, शाखाधिकारी प्रतिभा कदम, मयुरी आंबरे,निलेश मोरे
तसेच माळशेज पतसंस्था देवठाण शाखेचे अध्यक्ष श्रीकांत शेठ सहाणे, माळशेज पतसंस्था डुंबरवाडी शाखाधिकारी मंगेश तांबे, आण्णासाहेब आंबरे,विठ्ठल आंबरे,देवराम आंबरे,संजय आंबरे,खंडू आंबरे,वसंत आंबरे,ललिता आंबरे,विजय उगले,सुदाम मोरे, गोविंद सहाणे,नानासाहेब दळवी,बाळासाहेब वाकचौरे आदी सभासद उपस्थित होते.
सूत्र संचालन माळशेज देवठाण शाखेचे अध्यक्ष श्रीकांत सहाणे यांनी केले.


