पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी)- तालुक्यातील धामणगाव आवारी येथे रोटरी क्लब अकोले सेंट्रल, रोटरी आय केअर हॉस्पिटल संगमनेर व ग्रामपंचायत धामणगाव आवारी यांच्या संयुक्त विद्यमाने धामणगाव आवारी येथे मोफत नेत्र( डोळे) तपासणी शिबिरात 167 नागरिकांनी लाभ घेतला .त्यापैकी 17 रुग्णांवर संगमनेर रोटरी नेत्र रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
धामणगाव आवारी येथील ग्रामपंचायत कार्यालया जवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख, माजी अध्यक्ष सचिन आवारी,सचिन शेटे,विद्यमान सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, रोहिदास जाधव,रोटरी आय केअर हॉस्पिटलचे डॉ.पाटील, डॉ .शिंदे, संदीप घुले,व त्यांचे सहकारी, राधाकीसन पोखरकर , अशोक देशमुख,किसन आवारी, बाळासाहेब आवारी,आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी हभप दीपक महाराज देशमुख म्हणाले की, आंतर राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या रोटरी क्लबने जगात पोलीओ निर्मूलनाचा संकल्प केल्याप्रमाणे सर्व जगातून पोलिओला हद्दपार केले आहे तसेच आता रोटरी क्लबने अंध मुक्त गाव हा संकल्प केलेला आहे. त्याप्रमाणे गावोगावी जाऊन नेत्र तपासणीचे शिबिरे आयोजित केली जातात.त्याच अनुषंगाने आज अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते व लाल तारा मेडिकलचे संचालक सचिन आवारी यांच्या विशेष प्रयत्नातून रोटरी क्लब अकोले सेंट्रल व रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेर यांच्या वतीने धामणगाव आवारी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण अधिकाधिक संख्येने या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत उपसरपंच गणेश पापळ यांनी केले.
तर आभार तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष रमेश आवारी यांनी मानले.

