पुन्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आढळा विभागातील डोंगरगाव व परिसरात काल दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास डोंगरगाव येथे तुफान पावसाने मोठे नुकसान झाले आहेत शेतात प्रचंड पाणी साठले असून शेतात कांद्याचे पोळ लावलेले असून ते कांद्याच प्रचंड पावसामुळे पाण्यात गेले आहेत डोंगरगाव चिकणी ,नळवाडी परिसरात मोठे पावसाने नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून आढळा विभागात मोठे पावसाने सतत नुकसान होत आहे यातच काल दुपारी डोंगरगाव व परिसरात वाऱ्या सह पावसाने कांदा,डाळिंब,आंबे यांचे फार मोठे नुकसान झाले. तसेच डोंगरगाव ते चिकणी रोडचे असलेले झाडे वाऱ्याने रस्त्यावर पडले आहे रोड पूर्ण रोड बंद झाला होता.

तरी परिसरात खूप मोठे नुकसान झाले आहे.
त्यातच भर म्हणून की काय कृषी सहाय्यक देखील संपावर असून काम बंद आंदोलन सुरू असल्याने पंचनामे देखील वेळेत होतात की नाही हेही अजून प्रश्न असून तालुका व जिल्हा प्रशासनाने तातडीने पाणी शेतांमध्ये आहे तेच नुकसानीचे पंचनामे करावेत काही ठिकाणी घरांची देखील नुकसान झाले आहे. होणाऱ्या नुकसानीचे नुकतेच पंचनामे न करता तातडीने काहीतरी मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे डोंगरगाव गनोरे पिंपळगाव निपाणी विरगाव देवठाण सदर आडळा खोऱ्यात नुकसान जास्त प्रमाणात नुकसान आहे तरी प्रशासनाचे अधिकारी अजून पोचलेले दिसत नाही. तरी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी डोंगरगाव व परिसरातील शेतकरी यांनी आवाहन केले आहे हिवरगाव मध्ये देखील माळ पठारा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्याही ठिकाणी अतिशय नुकसान झाल्याचे त्या ठिकाणची स्थानिक शेतकरी सांगत आहे. याही ठिकाणी तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे. या भागामध्ये मोठे पावसाने नुकसान झाले असून वावरत असलेले कांदे देखील या पाण्यात भिजलेले आहेत काही ठिकाणी घरांवर,गायीच्या गोठ्यावर झाडे पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
या सर्व गोष्टींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आढळा विभागात तातडीने पंचनामे करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा दयावा.


