पुण्यवार्ता प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव)
अकोले तालुक्यातील अंबड पाडाळणे रस्त्यालगत असलेल्या वाघजाळ रस्ता काल झालेल्या ढगफुटी सदृष्य पाऊसामुळे वाहून गेला आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी व दुध व इतर वाहतूक करणाऱ्या नागरीकांना गुडघाभर पाण्यातून आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे मागच्या दोन वर्षांपूर्वी याच रस्त्यावर पुराच्या पाण्यात चार चाकी गाडी वाहुन गेली होती परंतु नशीब बलवत्तर म्हणून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला अटकली म्हणून त्यामधील एका व्यक्तीचा जीव वाचला होता अनेक वर्षे या रस्त्यावर शिडीवर्क व्हावा या प्रश्नांवर स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतकडे आवाज उठवून मागणी केली आहे परंतु अध्याप कुठल्याही प्रकारची कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली नाही.
सदर ठिकाणी रस्ता खचल्याने शालेय विद्यार्थी मंजूर दुग्धव्यवसायीक यांना मोठी कसरत करून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे त्यामुळे ग्रामपंचायतने तातडीने रस्त्यावर सिडीवर्क टाकण्यासाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करून नागरीकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
