पुन्य वार्ता
लिंगदेव ( प्रतिनिधी ):अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे पुर्वापार चालत आलेली गुढी पाडव्याला संगीत आखाडीची परपंरा पुर्वापार चालतआलेलीआहे .महाराष्ट्रात नावालेली व नाविन्य पुर्णता असलेली धार्मिक , सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे हे धर्मोत्सवाचे पर्व श्री क्षेत्र लिंगदेव या ठिकाणी पहावयास मिळते . भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट ला यावर्षी ‘ ब ‘ वर्ग दर्जा प्राप्त झाला असुन अकोले तालुक्याचे आमदार.डॉ.किरणजी लहामटे साहेब यांच्या कडून ” लिंगेश्वर सांस्कृतिक भवन” साठी ७० लक्ष निधी मंजूर करण्यात आला असुन पहिल्या टप्याचे काम प्रगती पथावर आहे. .या वर्षी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टला आखाडी सोंगाच्या लिलावातून १३ लक्ष ६३ हजार ५०० रुपयेमिळाले आहेत . या आखाडी बद्दल ग्रामस्थ रामायण महाभारतातील पारंपरिक पात्रे घेऊन सोंगे नाचवितात त्यांचा लिलाव बोलला जातो . ह्या लिलावाची वैशिष्टे म्हणजे गावातील भूमिपुत्रनाच ह्या आखांडी सोगांचा लिलाव घेता येतो . हा लिलाव भगवान लिंगेश्वर सभामंडपात घेतला गेला. हा लिलाव माईक द्वारे पुकारून व आवाज सह्याद्रीचा या
लाईव चैनल द्वारे प्रदर्शित केल्यामुळे भारत व भारत देशाच्या बाहेर व जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या भूमिपुत्राला सैनिक , व्यवसाय व नोकरी निमित्ताने बाहेर असणाऱ्याना हा लिलाव घेता आला .त्यामुळे जास्तीत जास्त भूमुपुत्रानी ह्या लिलावात भाग घेऊन प्रत्येक पात्रांची बोली लावता आली. एक वार दोन वार तीन वार करून हा लिलाव फायनल केला गेला .ह्या संगीत आखाडी च्या पात्राचा लिलाव झाल्यानंतर लगेच रोख किंवा ऑनलाईन स्वरुपात पत्राची रक्कम भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नावाने जमा करून रीतसर पावती दिली गेली.त्यांची ह्या पावतीवरइनकम टक्स ला सूट मिळते . ह्या आखाडी यात्रेच्या लिलावाची सुरुवात भगवान लिंगेश्वर नंदादीप ५२ किलो तेल देऊन युवा उद्योजक प्रमोद भाऊसाहेब पवार यांनी ४६००० रुपये देऊन हा लिलाव पटकावला , नंदादीप श्री दत्त १३ किलो तेल देऊन सदाशिव भिमाजी कानवडे यांनी १६००० रुपये किमतीला हा हा लिलाव घेतला , नंदादीप नवीन १३ मूर्ती २६ किली तेल देऊन बाळासाहेब विठ्ठल कोरडे यांनी १२१०० रुपये , भगवान लिंगेश्वर अभिषेक महापुजा – लिगेश्वर पतसंस्था क्लर्क सुरेश रामभाऊ पवार ३५००० रुपये . भगवान लिंगेश्वर वस्रअलंकार चढविणे विलास दत्तु फापाळे ६००० रुपये ,भगवान लिंगेश्वर महाआरती युवा उद्योजक ऋषिकेश दगडू पवार ७१००० रुपये यांनी पटकाविला .
या संगीत आखाडीचे यात्रेचे उद्घाटन इमेज हॉलिडेज अकोलेचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी युवक कार्याध्यक्ष हरिभाऊ मंजुळ फापाळे व श्रमिक ऑटोमोबाईल अकोले संचालक राधाकिसन मंजुळ फापाळे यांनी ६०००० रुपये सर्वाधिक बोली लावून पटकाविला तर दीप प्रज्वलन लिंगदेव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अमित राणेश घोमल यांनी ४५००० रुपयांना रोख बोली लावून पटकाविला .या संगीत आखाडीचे मुख्य आकर्षण व पहिले पात्र सुत्राधारासाठी लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त बन्सी पोपट कानवडे व समित राणेश घोमल यांनी सर्वाधिक ७०५०० बोली लावली , मच्छ अवतार – भूषण भाऊसाहेब कोरडे ११००० रुपये , मच्छ दैत्य – धवेंद्र देवराम आढाव ६००० रुपये , भिल्ल भिल्लीण – किरण चंद्रभान होलगीर १५००० रुपये कच्छ अवतार –माणिक प्रभाकर फापाळे ९५०० रुपये , कच्छ दैत्य – नितीन भानुदास कानवडे ७४०० रुपये वराह अवतार – संकेत शरद फापाळे ११००० रुपये , वराह दैत्य – इंजी जालिंदर भिमाजी कानवडे कानवडे ६००० रुपये ,राजा हिरण्य कश्यपु – मुंबई पोलीस भाऊसाहेब बन्शी होलगीर ७५००० रुपये , नरसिंह अवतार – सोमनाथ हरिदास फापाळे ८१०० रुपये , त्राटिका – इंजी मनोज बाळासाहेब कानवडे ,त्राटिका राम लक्ष्मन – सतीश राजाराम जाधव व संजय रामभाऊ फापाळे ३१००० रुपये , श्रुपनखा – संतु लक्ष्मण कानवडे १८५०० रुपये , श्रुपनखा राम लक्ष्मण – विलास दत्तु फापाळे २२००० रुपये , वाली सुग्रीव –राजेंद्र ज्ञानदेव हाडवळे १८००० रुपये ,राम परशुराम – मंगेश संतू कानवडे १४५०० रुपये ,ह्या आखाडी यात्रेतील सर्वात जास्त बोली असणारे पात्र म्हणजे इंद्रजीत – इंजी अमोल दत्तात्रय फापाळे १,११,००० रुपये , कुंभकर्ण –अभिजित भाऊसाहेब फापाळे १७००० रुपये, राम लक्ष्मण कुंभकर्ण – मुंबई पोलीस भीमाशंकर ठकाजी होलगीर ३०५०० रुपये , रावण – मेजर राजेंद्र ज्ञानदेव हाडवळे ७६५०० रुपये ,रावण राम लक्ष्मण – साईनाथ ठका पवार २२००० , बकासुर – प्रगतीशील शेतकरी मनोहर कान्हू फापाळे २२००० रुपये ,भीम – इंजी राहुल राहुल मनोहर फापाळे ५६००० रुपये यमराज – अमोल दत्तात्रय फापाळे ४२००० रुपये ,सत्यवान सावित्री –अतुल मारुती कानवडे १५३०० रुपये ,अर्जुन दुर्योधन ,अनुमान श्रीकृष्ण भीम अर्जुन- वाशी मार्केट व्यापारी संदीप बाळासाहेब फापाळे ५०००० रुपये ,शेंडी नक्षत्र –संजय उत्तम हाडवळे ५५०० रुपये ,एकादशी – धोंडीबा केरू पवार ११००० रुपये ,दैत्य एकादशी – श्रीकांत दगडू पवार ५६०० रुपये ,वेताळ - भास्कर चिमाजी शिंदे ३१००० रुपये,
कर्ण श्रीकृष्ण अर्जुन –धोंडीबा केरू होलगीर २२५०० रुपये ,दुर्योधन –कैलास ठका होलगीर १३५०० रुपये ,भीम दुर्योधन गोपाल सोपान हाडवळे ८५०० रुपये ,चंद्र सूर्य तुषार रंगनाथ पवार २०००० रुपये ,वीरभद्र दैत्य - परशुराम बाबुराव कानवडे ६००० रुपये
वीरभद्र – लिंगेश्वर देवस्थान विश्वस्त रामकृष्ण बाबुराव कानवडे १०५०० रुपये ,रक्तादेवी- राकेश सूर्यभान घोमल ८००० रुपये ,रक्तादेवी दैत्य – सागर रंगनाथ कानवडे ५६०० रुपये ,भस्मासुर –शुभम सुरेश कानवडे ८००० रुपये ,मोहिनी –आयुष संदीप फापाळे ४५०० रुपये ,दैत्य वेताळ डॉ-ऋषीकेश रावसाहेब कानवडे ९००० रुपये ,खंडेराय – एकनाथ मधुकर कोरडे ४२००० रुपये ,वाघ्या मुरली – राहुल देवराम कोरडे १८००० रुपये ,अभिमन्यु – प्रगतशील शेतकरी अनिल राधुजी हांडे २२१०० रुपये ,लेझीम –सुरेश उत्तम हाडवळे ७०० रुपये ,घटोत्कच – प्रगतशील शेतकरी धोंडीबा विष्णु कानवडे २५००० रुपये ह्या सर्व गावातील भूमिपुत्रांनी जास्तीत जास्त रोख बोली लावून संगीत आखाडी पात्रांचा लिलाव पटकाविला .ह्या सर्व भूमिपुत्रांचे भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट व लिंगदेव ग्रामस्त कडून अभिनंदन करण्यात आले .
अवघ्या काही दिवसावर आलेल्या या उत्सवासाठी लोकांची लगबग सुरु झाली आहे . शेतातील सर्व कामे घरांची रंगरंगोटी उरकत आली आहे. गावातील दुकानदारही मालाच्या खरेदी विक्री साठी सज्ज झाले आहे . नवनवीन वाहनाची खरेदी , पाहुण्यांना निमंत्रण व गावातील सासरी गेलेल्या मुलींनाही गुढी पाडव्याला माहेरी येण्याची ओढ लागते . गावात ग्रामपंचायत अंतर्गत दिवा बत्ती, रस्ते , साफसफाईची कामे उरकत आली आहे . गावातील हॉटेल व्यावसायिक गुढी पाडव्यासाठी आवश्यक असणारी गुडीशेव , रेवडी तयार करण्यात गुंग झालेली आहे . बहुतेक गावात गुडीशेव रेवडी हि भगवान लिंगेश्वराच्या यात्रे पासुन पहावयास मिळते आहे .
गुढी पाडव्याचा यात्रोत्सव चांगल्या प्रकारे साजरा होण्यासठी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट , लिंगदेव यांच्याकडून विविध प्रयत्न होत आहे . या यात्रोत्सवासाठी महाराष्ट्रातुन शिवभक्त हजर राहत असतात . मागील वर्षापासून अकोले व संगमनेर तालुक्यातील लेझीम स्पर्धेचेही आयोजन केले जात आहे व या यात्रे निमित्त आपली लेझीम कला कौशल्य सादर करण्याची संधी मिळत आहे . या लेझीम पथकात चांगल्या प्रकारे कौशल्य दाखविणाऱ्या संघासाठी बक्षिसांचे आयोजन लिंगेश्वर देवस्थान तर्फे करण्यात आले आहे . मागील काही वर्षापासुन विदेशीपाहुणेही या यात्रा उत्सवासाठी हजेरी लावत आहे . त्यामुळे या यात्रोत्सवाची लीला हि विदेशातही जाऊन पोहचलेली आढळून येत आहे. हा यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट ,ग्रामपंचायत लिंगदेव व लिंगदेव ग्रामस्थांकडून चोख नियोजन केले जात आहे .या यात्रा उत्सवासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट व लिंगदेव ग्रामस्थांकडून केले आहे .
लिंगदेव प्रतिनिधी :- हरिभाऊ फापाळे ९३७१८०६०८३ ,९९२१६४२४६८



