पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- तालुक्यातील नामांकित शाळे मध्ये नाव होत असलेल्या आणि दिवसेंदिवस यशाचे सर्वोच्च शिखर गाठत असलेल्या परफेक्ट इंटरनॅशनल स्कुल चे नाव लोकनेते मधुकरराव पिचड परफेक्ट इंटरनॅशनल स्कुल होणार असल्याचे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर यांनी केले.
आज परफेक्ट इंटरनॅशनल स्कुल मध्ये पालक मेळावा आयोजित केला होता.त्यावेळी सुनील दातीर बोलत होते.
पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव , विश्वस्त मधुकरराव सोनवणे, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, यशवंतराव आभाळे, शरदराव देशमुख,कल्पना ताई सुरपुरीया, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, एस .पी.मालुंजकर पालक प्रतिनिधी डॉ.रविंद्र सावंत,विजय पावसे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमा मध्ये परफेक्ट इंग्लिश मिडीयम स्कुल चे रूपांतर सीबीएसई मध्ये व्हावे अशी पालकांनी इच्छा व्यक्त केली होती. ते करीत असताना संस्थेला अनेक अडचणी आल्या मात्र सर्व अडचणीवर मात करत आज परफेक्ट इंग्लिश मीडियम चे रूपांतर सीबीएससी पॅटर्न अंतर्गत परफेक्ट इंटरनॅशनल स्कुल मध्ये झाल्याचा आनंद आहे. प्राचार्या नवले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी प्राचार्या मीनाताई नवले यांनी आपल्या प्रास्ताविकात स्कूल चा 2016 ते 2024 पर्यंतचा प्रवासाच्या प्रगतीचा अहवाल पालकांसमोर मांडला. कार्यक्रमाची सुरुवात अकोले तालुक्याचे भाग्यविधाते अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त स्व.मधुकररावजी पिचड साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली पालकांनी संपूर्ण शाळेला भेट देऊन अद्ययावत लॅब आणि ग्रंथालय यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी कलाविष्कार सादर करून सर्वांची वाहवा मिळविली.
अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यामध्ये पालकांनी विद्यार्थ्यांवर होत असलेले संस्कार व त्यांची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती याबद्दल प्राचार्या व सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले तसेच शाळेमध्ये अकरावी बारावीचे वर्गही सुरू करावे यासाठी पालकांनी आग्रह धरला त्याप्रमाणे शाळेमध्येच JEE आणि NEET या परीक्षांचा सराव करून घेण्यात यावा असे पालकांनी मत व्यक्त केले.पालक मेळाव्याचे सूत्र संचालन कु. वेदिका देशमुख व काजल सावंत यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

