पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी –इतिहास आणि धर्मग्रंथांचे वाचनाने आपले जीवन बदलू शकते असे प्रतिपादन पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) प्रा. एस. झेड. देशमुख यांनी केले.आपल्या ओजस्वी भाषणातून विद्यार्थ्यांना इतिहास व धर्मग्रंथ वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, मवेशी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रा. एस झेड देशमुख हे अध्यक्षस्थानी होते .
यावेळी उद्योजक माणिकराव डावरे, आयुर्वेदाचार्य बाळासाहेब कोंडार, माजी मुख्याध्यापिका मीराताई आभाळे,रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते,भीमाशंकर नाडेकर,संस्थेचे सचिव शांताराम काळे,मुख्याध्यपिका सौ.मंजुषा काळे,स्वप्नील काळे,वांजुळशेत च्या सरपंच पद्मिनी ताई भांडकोळी, शरद कोंडार,पांडुरंग भांगरे, माधव गभाले, यमाजी कोंडार,अनिता कोंडार,झुणकाबाई धिंदळे,माजी मुख्याध्यापक विलास महाले , मुख्याध्यापक
किरण भागवत, सतीश काळे,स्मिता पानसरे,करपे मॅडम, वाघमारे सर,अनिल नाईकवाडी हे उपस्थित होते.
प्रा.एस.झेड.देशमुख सर पूढे म्हणाले की,
“वाल्मिकी ऋषी जन्मतः संत नव्हते. ते रस्त्यावरील लोकांना लुटणारे डाकू होते. पण योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर ते महर्षी झाले आणि त्यांनी ‘रामायण’सारखा अमर ग्रंथ लिहिला. यातून काय शिकायला मिळते? बदल इच्छाशक्तीत असतो. कोणताही विद्यार्थी आज जसा आहे, तसाच राहणार नाही. जर योग्य विचार, परिश्रम आणि आत्मशोधाची जाणीव ठेवली तर प्रत्येकालाच मोठे होता येते.”
विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी पुढे सांगितले की,
“राम, कृष्ण, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांचे विचार आत्मसात करा. हे केवळ पुतळ्यांमध्ये नाहीत, तर त्यांच्या विचारांमध्ये आहेत. इतिहास वाचला तर आपणास समजेल की ज्ञानेश्वरी, शिवचरित्र आणि तुकाराम गाथांमध्ये किती वैज्ञानिक तत्त्वे दडलेली आहेत. पण ही ग्रंथसंपदा नुसती पूजेत ठेवून उपयोग नाही. तिला वाचले पाहिजे, मनन केले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे.”
“पालक आणि शिक्षक यांची जबाबदारी आहे की त्यांनी मुलांवर केवळ शाळेतील शिक्षणाचेच नव्हे, तर उत्तम संस्कारांचेही बीजारोपण करावे. जर आपल्या मुलांमध्ये न्याय-अन्याय यातील फरक ओळखण्याची ताकद नसेल, तर त्यांचे शिक्षण अपूर्ण राहील.”
त्यांच्या या प्रभावी भाषणाने संपूर्ण प्रेषक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे उद्योजक माणिकराव डावरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले,संस्कार आणि शिक्षण हातात हात घालून चालले पाहिजेत
“शिक्षणासोबतच योग्य संस्कार मिळाले तरच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात.”
त्यांनी या मध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून आपले आई वडिलांचे,शाळेचे व स्वतः चे नाव मोठे करावे असे
सांगून विद्यालयाला भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा काळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि आपले कलागुण सादर केले. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले.
हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, अशा उपक्रमांमुळे शाळेच्या शैक्षणिक आणि संस्कारक्षम वाटचालीस चालना मिळते, व
विद्यार्थ्यांना नव्या उमेदीची प्रेरणा मिळते
असे प्रतिपादन ब आयुर्वेदाचार्य बाळासाहेब कोंडार, मुख्याध्यापिका मीरा आभाळे ,पांडुरंग भांगरे, मवेशी च्या सरपंच कलमताई बांबळे,शरद कोंडार, शरद भांगरे, धोंडोपंत बांबळे आदी मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुषा काळे यांनी केले. सूत्रसंचालन मच्छिंद्र देशमुख यांनी केले, तर आभार प्राचार्य किरण भागवत केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
चौकट –
राज्य गणित विज्ञान प्रदर्शनात सिद्धार्थ मच्छीन्द्र देशमुख याचा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल त्याचे व शिक्षक सतिष काळे यांचा सोपानराव देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

