पुन्य वार्ता
श्री दत्त कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयुट, राजूर या संस्थेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग यशस्वी परंपरा कायम
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या जीसीसी-टीबीसी शासकीय कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स या डिसेंबर,२०२४ परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यात विषेश प्राविण्यासह विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
श्री दत्त कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयुट राजूरचे ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागातील विद्यार्थी:- इंग्रजी विषयात ३० श.प्र.मी.मध्ये प्रथम क्रमांक – लहामगे निखिल काशिनाथ ९५%, द्वितीय क्रमांक – भांगरे पवन पांडूरंग ९२.५०%, तृतीय क्रमांक – चौधरी सागर विष्णूदास ९०% व गहिरे संकेत बापूसाहेब ९०% मराठी ३० श.प्र.मी मध्ये प्रथम क्रमांक – सावळे प्रतिक्षा पांडूरंग ९३.५०%, द्वितीय क्रमांक – आसवले प्रमिला मनोहर ९३%, तृतीय क्रमांक – चावडे विशाल निवृत्ती ९०% गुण तसेच इंग्रजी ४० श.प्र.मी.मध्ये प्रथम क्रमांक – आसवले प्रमिला मनोहर ८२% आणि मराठी ४० श.प्र.मी मध्ये प्रथम क्रमांक – पंडित ज्ञानेश्वरी अनिल ८३.५०% घेऊन उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य पंकज आभाळे सर व संस्थाचालक श्री आभाळे सर आदींनी अभिनंदन केले व या यशात विद्यार्थ्यांचा नियमितपणा, कठोर परिश्रम व पालकांचा विश्वास याचा मोठा वाटा आहे अशी भावना व्यक्त केली.
