पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी )
५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान गणित पर्यावरण प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते शुभ हस्ते संपन्न होणार आहे
२३जानेवारी ते २५जानेवारी रोजी आनंदगडावर संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली . अध्यक्षस्थानी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे असणार आहेत.
तीन दिवस चाललेल्या प्रदर्शनात विज्ञान गणित व पर्यावरण विषयाचे विविध उपकरणे विद्यार्थी वैज्ञानिकांनी मांडली होती २४जानेवारी रोजी त्या सर्वांचे परीक्षण होऊन २५ जानेवारी रोजी पारितोषिक वितरण व समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खा. सुधीर लंके आमदार सत्यजित तांबे ,आमदार अमोल खताळ ,आमदार विक्रम सिंग पाचपुते आंतरभारती संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील गटशिक्षणाधिकारी अभय कुमार वाव्हळ व जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभागाचे विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन धनंजय भांगरे व सतीश काळे यांनी केले आहे.
