पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
केमिस्ट हृदय सम्राट तथा माजी आ. जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तअकोले तालुका केमिस्ट असोसिएशनच्या 24 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 104 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडले.
सदर रक्तदान शिबीर हे मराठी मुलांची शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी संगमनेर येथील आधार रक्तपेढी यांचे विशेष सहकार्य लाभले.
रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांना आधार रक्तपेढी व केमिस्ट असोसिएशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या रक्तदान शिबिराला तालुक्याचे आ.डॉ.किरण लहामटे यांनी सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सह सेक्रेटरी सचिन शिंदे,तालुकाध्यक्ष राजेश धुमाळ, सेक्रेटरी महेश येवले, खजिनदार केरु वाकचौरे, अरुण सावंत, रवी कोटकर, सचिन आवारी आदीसह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
