पुण्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
अकोले तालुका,अहिल्यानगर जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याच्या एका दर्जेदार, गुणवान मरेथाँन धावपट्टू अथेलँटीक क्रिडा प्रकारातील उद्यउन्मुख खेळाळू प्रवीण गिऱ्हे आपण गमावला. ज्याने आपल्या चमकदार कामगीरी व प्रचंड कष्टाच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्या व ढिगभर पदके मिळवली.मुबंई,पुणे,नाशिक,संभाजीनगर, परभणी येथील अनेक मोठ्या राज्यस्तरीय मँरोथान स्पर्धा गाजवत डोंगरगाव चे नाव रोशन केले भविष्यात नक्कीच देशाचे नाव त्याने उज्वल केले असते असा गरीब आदिवासी ठाकर कुटूंबातील प्रविण गणपत गिर्हे हा युवक अवघ्या 22 व्या वर्षी आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याने पुढील पिढीचा दीपस्तंभ, प्रेरणास्रोत, मार्गदर्शक व युवकांचा आयकॉन आपण गमवला.व कुटूंबाचे व गावचे न भरुन येणारे मोठे नुकसान झाले.अशा खेळाडूस भावपूर्ण श्रद्धांजली..श्रद्धांजली
त्यांचा अंत्यविधी डोंगरगांव आढळातीरी दुपारी शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सर्व डोंगरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




