पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- वृत्तपत्र क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नवभारत -नवराष्ट्र माध्यम समूहाच्या वतीने अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांना राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी मधुकरराव नवले म्हणाले की, माझ्या जीवन घडणीत अनेकांचा वाटा आहे, या तालुक्यातील जनतेने माझ्या वर प्रेम केले आहे.मला माझ्या पदावरून मला कोणी हाक मारली नाही तर माझी भाऊ म्हणून ओळख निर्माण केली. अनेक चळवळी, संस्था उभारणी करताना मला तालुक्यातील जनतेने साथ दिली, त्यामुळे “हा पुरस्कार माझा नसून तालुक्यातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेचा आहे!” असे कृतज्ञतापूर्वक मनोगत मधुकरराव नवले यांनी व्यक्त केले.
भव्य रंगमंच,भव्य स्क्रीन,फटाक्यांची आतिषबाजी,उत्कृष्ट विद्युत रोषणाई,शिस्त बद्ध नियोजनाच्या वातावरणात मधुकरराव नवले यांना मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल,फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मानपत्राचे वाचन प्रा.हेमंत मंडलिक यांनी केले.तर राजेंद्र मालुंजकर यांनी बनविलेल्या मधुकरराव नवले यांच्या सतत उंचावलेला जीवनाचा आलेख ऑडिओ- व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून पाहताना उपस्थित भावुक होताना दिसून आले.
सदर पुरस्कार प्रसिद्ध मराठी फिल्म, टी.व्ही व थिएटर आर्टिस्ट व हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव यांच्या शुभहस्ते तसेच प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ, प्रख्यात समाजसेविका व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. डॉ. जयश्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली
व नवराष्ट्र समूहाचे ब्युरोचीफ सुहास देशपांडे, सहाय्यक कार्यालयीन अधिकारी अविनाश कराळे, नवराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,
योगेश संभेराव, कमलताई संभेराव, मयूर जाधव, ऋषी कुऱ्हाडे, स्वप्नील कांडेकर,सौ.सुमन नवले, शांताराम गजे, प्रकाश टाकळकर, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन रमेशराव जगताप, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूरचे निरीक्षक श्याम कांबळे, कचरू पा.शेटे,ॲड. के.बी.हांडे ॲड सागर शिंदे, प्राचार्य विलास नवले ॲड.आनंदराव नवले,मंदाबाई नवले,अमोल वैद्य,मनोज गायकवाड,
अभिनव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा कॅम्पस डायरेक्टर डॉ.जयश्री देशमुख,प्राचार्या तथा सह सचिव अल्फोन्सा डी., कोषाध्यक्ष विक्रमराव नवले सहसचिव भागवतराव नवले,प्राचार्या राधिका नवले, प्राचार्या कुसुम चव्हाण, प्राचार्या स्मिता पराड, प्राचार्या तिलोतम्मा कर्डीले,मनीषा आभाळे,स्मिता पुंड,मासर्व संचालक मंडळ सर्व विभागांचे प्राचार्य, सर्व पत्रकार बांधव, अभिनव शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागांचे प्राचार्य व विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नवराष्ट्र चे सहाय्यक महाव्यवसस्थापक अविनाश कराळे म्हणाले की,मधुकरराव नवले हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून एक सुशिक्षित, अभ्यासू, सुसंस्कृत चेहरा आहे.अशा सुसंस्कृत व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद वाटतो व आमचे भाग्य समजतो.
स्वागत व प्रास्ताविक करताना विद्याचंद्र सातपुते यांनी मधुकरराव नवले यांच्या सर्व क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला, संघर्षातून अभिनव शिक्षण संस्था,बुवासाहेब नवले पतसंस्था, मल्टिस्टेट को- ऑप.क्रेडिट सोसायटी या संस्था उभ्या केल्या. सहकार क्षेत्रात त्यांचे काम चांगले व आदर्श असून ते साहित्यिक, संपादक क्षेत्रात ही त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी नेहमीच सर्वांना मन सन्मानाने वागणूक दिली असून हा त्यांचा कौतुक सोहळा नसून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव सोहळा आहे, ही बाब अकोले तालुक्यासाठी अभिमानाची आहे असे मत व्यक्त केले.व सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता सोलापुरे व हेमंत मंडलिक यांनी केले.
