पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
टीजीआय ग्रुप ऑफ कंपनीच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त टीजीआय नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 हा पुरस्कार नाशिक माहेश्वरी भवन येथे लोणी येथील आर्ट ऑफ लिविंग च्या प्रशिक्षिका व समाजसेविका श्रीमती सुनीता तांबे यांना हा पुरस्कार महाभारतातील द्रोणाचार्य यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुरेंद्र सिंग पाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला श्रीमती सुनिता तांबे यांनी आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाने गावा गावात शहरात शाळा कॉलेज अनाथ आश्रम वृद्धाश्रम पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी अशा अनेक ठिकाणी जाऊन हजारो लोकांना जीवन जगण्याची कला शिकून त्यांच्या जीवनात बदल घडविले तसेच सामाजिक कार्यातून ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून शिर्डी स्वच्छ अभियान वृक्षरोपण , बेटी बचाव अभियान, सेंद्रिय शेती अभियान अशा अनेक सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी टीजीआय ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक श्री सुदर्शन कदम, राज्य जीएसटीचे सहआयुक्त श्री दीपक वैष्णव, नॅशनल प्रेसिडेंट सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशनचे श्री संदीप कसाळकर, श्री पंढरीनाथ पगार उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील, माजी मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार सुजय दादा विखे पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंदडा, कृषीभूषण श्री राजेंद्रजी कुंकूलोळ, जिल्हा बँक राहता तालुका विकास अधिकारी श्री सचिन तांबे यांनी अभिनंदन केले
