पुण्य वार्ता
प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव)अकोले तालुक्यातील अंबड येथील अंबिका माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच जवळे कडलग गावचे सुपुत्र कैलास कोते यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड पुरस्कार जाहीर झाला असून रविवार २७ ऑक्टोबर रोजी मालेगांव येथे या पुरस्काराचे वितरण मंत्रालयातील निवृत आरक्षण अधिकारी विजया शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे किशोर चौधरी चंद्रशेखर शिंपी नानासाहेब पठाडे सुनिल पाटील आर डी निकम नरेंद्र महाराज गुरव नवनाथ धनवटे प्रभाकर सुर्यवंशी अमोल अहिरे उपस्थित राहाणार आहे कैलास कोते यांनी क्रीडा शिक्षण व समाजसेवेत आपल्या कामाच्या माध्यमातून ठसा उमटविला त्यामुळे चार पाच देशांच्यामधुन कैलास कोते यांची जागतिक समुदायाने निवड करून त्यांना पुरस्कार दिला त्या बद्दल त्यांचे अंबिका माध्यमिक विद्यालय तसेच अंबड व जवळेकडलग ग्रामस्थांनी आभार मानले पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

