पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- माजी मंत्री मधुकरराव पिचड हे आजारी असल्याने त्यांचे हाताखाली काम करणारे कर्मचारी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले की, पिचड साहेब यांचा सारखा साहेब लाभणे हे आमचे भाग्य आहे.पिचड साहेब व त्यांच्या परिवाराने कधीही जातीवाद केला नाही,जातीभेद केला नाही .आम्ही सर्व कर्मचारी गुण्या गोविंदाने एकत्र नांदतो.आम्ही त्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत जातो, हक्काने काही लागले तर हाताने घेतो.मोसीम पठाण व संजय पाडेकर,रामदास कानवडे,काठे यांनी नाशिक येथे दवाखान्या समोर बोलताना म्हणत होते की, पिचड परिवारात मुस्लिम,तेली,शिंपी, बौद्ध,न्हावी,गुरव,घिसाडी,मातंग,कांदडी ,वंजारी,मराठा, आदिवासी, असे सर्व जाती धर्माचे लोक काम करतोय. आम्हालाही कधीही आपण वेगवेगवेगळ्या जातीचे आहोत अशी पुसटशी भावनाही आमच्या मनाला शिवली नाही.कारण साहेब,बाईसाहेब, भाऊ वहिनी,डॉक्टर ताई,भैय्या यांनी आम्हाला कधीही वेगळी वागणूक दिली नाही.आम्हाला घरातले ,कुटुंबातील सदस्य म्ह्णून वागणूक देत आहे,दिली आहे.
आमचे साहेब कितीही आजारी असू द्या,त्यावेळी कितीही टेंन्शन चे वातावरण असले तरी आमच्या पैकी कोणाला का होईना 200 रूपये,500 रुपये,2000 रुपये देणारच .ब्रेन स्ट्रोक झाला तरीही आमच्यापैकी एकाला पहाटे 200 रुपये दिले. आणि कितीही आजारी असले तरी आम्हाला नाव घेऊन ये तू माझ्याबरोबर चल असे म्हणणारच.इतका विश्वास आमच्यावर त्यांचा आहे ,आणि हेच त्यांचे प्रेम,पुण्य साहेबाना लवकरच बरे वाटून ते आम्हाला जवळ बोलावतील याचा विश्वास आहे. ,त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. हे सांगताना सर्वजण भावुक झाले होते.
