पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनी जीवनात अभ्यास तरुण स्वतःचे स्थान निर्माण करावे असे प्रतिपादन मॉडर्न हायस्कूल चे सेवा निवृत्त प्राचार्य तथा रोटरी क्लब चे सदस्य संतोष कचरे यांनी केले.
पिंपळदरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या परिसरात रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले.त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य होते.यावेळी रोटरी क्लब चे विद्यमान अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते,माजी अध्यक्ष सचिन शेटे, शहाजी काळे,अभिनंदन साळवे,मुख्यध्यापक धनंजय मलाव सर,सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.कचरे सर म्हणाले की, विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणा शिवाय पर्याय नाही.सर्वांनी आपल्या आई वडिलांना सांगावे की, आम्हाला शिकायचे आहे. तुम्ही खूप अभ्यास करावा, तुमच्या मध्ये राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु लपलेल्या आहेत.तुमच्या मध्येही अधिकारी होण्याची क्षमता आहे.ही आश्रमशाळा अतिशय उत्कृष्ट असून अशी तालुक्यात आश्रमशाळा नाही.सर्व सुविधा युक्त या शाळेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे मत व्यक्त केले.
विद्यमान अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते म्हणाले की, वृक्षरोपण उपक्रम हा इव्हेंट कार्यक्रम नसावा,फक्त फोटो आणि बातमी साठी नसावा,विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल वैद्य म्हणाले की,विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये. आपल्या मध्ये असलेल्या क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे पाऊले उचलावी.वृक्षरोपण ही काळाची गरज ओळखून आपण लावलेल्या झाडांचे संगोपन करा,त्याची फळे आपल्यालाच चाखायला मिळणार आहेत असे मत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय मलाव यांनी केले.सूत्रसंचालन विजय सहाणे यांनी केले.तर आभार सुनीलशेळके यांनी मानले.
चौकट- रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने 100 वृक्ष रोपण करण्यात आले तर त्यांचे संवर्धन होण्यासाठी ट्रि गार्ड ही देण्यात आले.या साठी रोटरी क्लबचे पर्यावरण डायरेक्टर संदीप मालुंजकर व आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रा.शिक्षक संभाजी वैद्य, मुख्याध्यापक बाबाजी वैद्य आणि शिवाजी वैद्य यांनी विशेष सहकार्य केले.

