पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अकोलेत येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपुजन कामांचा शुभारंभ व जाहीर सभा आयोजित केली आहे
मा. ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे रविवार दि.०६/१०/२०२४ रोजी जन सन्मान यात्रेच्या अनुषंगाने अकोले येथे येणार असन त्यांची जाहीर सभा सकाळी 11वाजता बाजारतळ येथे होणार आहे, अशी माहिती शहर अध्यक्ष विनायक धुमाळ यांनी दिली.
आमदार डॉ.किरण लहामटे यांनी अकोले शहरासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडून भरघोस निधी आणला असून अकोले शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. बाजारतळाचे काँक्रीटीकरण तसेच नवीन ओटे व लाईटचे विद्युत दिवे बसविले गेल्याने बाजारतळात पूर्ण लखलखाट झाला आहे. बसस्थानकाचे संपूर्ण काँक्रीटीकरण व सुशोभिकरण झाले आहे.
अकोले शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा पुतळ्याचे नुतनीकरण व भव्य असा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला आहे. शहरातील अनेक रस्त्याचे काँक्रीटीकरण, कारखाना रोड तसेच देवठाण रोड, तहसिल कचेरी रोड भव्य अशा तहसिल कार्यालयाची इमारत बांधकाम तसेच महालक्ष्मी मंदिराकडे जाणारा परखतपूर रोड, अकोले शहरासाठी उपजिल्हा रूग्णालय मंजुर झाले आहे. तसेच एमआयडीसी मंजुर झाली आहे. यापुढेही अकोले शहरासाठी अनेक विकासाची कामे करण्याचा आमदार डॉ किरण लहामटे यांचा मानस आहे.
तरी अकोले शहरातील सर्व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने मा. ना. अजितदादा पवार यांच्या सभेसाठी उपस्थित रहावे, अशी विनंती श्री अगस्ति सह. साखर कारखाना चेअरमन सिताराम गायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरदराव चौधरी, उपाध्यक्ष डॉ. मनोज मोरे, सेक्रेटरी प्रशांत धुमाळ, शहराध्यक्ष विनायक धुमाळ,
युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष अक्षय अभाळे, कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हरिभाऊ फापाळे
उपाध्यक्ष सोमनाथ बाळसराफ, ज्ञानेश्वर चौधरी, आबा नाईकवाडी, संतोष नाईकवाडी, विकास वाकचौरे, साहेबराव लांडगे यांनी केली आहे.

