पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्याचे आराध्य दैवत महामुनी श्री अगस्ति ऋषी महाराज यांच्या आश्रमात चालू असलेल्या अध्यात्मिक व्यक्तीमत्व विकास व बाल सुसंस्कार शिबिरा मध्ये ८० शिबिरार्थींसमवेत भक्तिमय व राष्ट्र भक्ती पर गीतांच्या सुरेल मैफिलीने रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या कौटुंबिक परिवाराचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.
अगस्ति आश्रम येथे स्नेह मेळाव्या निमित्त रोटरी परिवाराचे सदस्य तथा पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख, संदीप मालुंजकर,अनिल देशमुख व डॉ .गणेश नवले यांनी सर्व ८० शिबिरार्थींना व रोटरी परिवारातील १२० सदस्यांना या स्वादिष्ट मिष्टानाचे स्नेहभोजन दिले.
तसेच यावेळी हभप इंद्रभान कोल्हाळ,हभप कुलदीप नेवासकर,हभप संकेत महाराज आरोटे,हभप तळपाडे महाराज,युवराज अनिल देशमुख, संदीप महाराज थोरात, अरुण महाराज शिर्के ,
अनिल महाराज रुपवते,स्वरा नेवासकर,सुनीलनाना रासने आदींसह अन्य कलाकारांनी भजनासह भक्तिमय व राष्ट्र भक्तीपर सुरेल गीतांची मेजवानी देऊन या मैफीलीचा आनंद द्विगुणित
केला.
अध्यात्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या स्नेहमेळाव्यात रोटरी सदस्यांच्या कुटुंबातील महिलांनी या मनमुराद आनंद लुटला.
या स्नेह मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर सूत्र संचलन , पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख यांनी केले.आभार सेक्रेटरी अमोल देशमुख यांनी मानले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी क्लब चे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
चौकट-
रोटरी प्रचाराचा नवा मार्ग!*
अकोले तालुक्याचे आराध्य दैवत अगस्ती ऋषी यांचा आश्रम, अकोले येथे रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. रोटरी कुटुंबाच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात तालुक्यातील वारकरी संप्रदायाशी संबंधित उदयोन्मुख कीर्तनकार, प्रवचनकार, व भजनी मंडळातील दिग्गज कलाकारांनी आपल्या सुमधुर वाणीतून उपस्थितांना अध्यात्मिक आनंद दिला. त्याचबरोबर त्यांनी कीर्तन, भजन, प्रवचन या माध्यमातून समाजसेवेच्या कार्याचा गौरव करत रोटरीचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवले.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून रोटरी क्लब अकोले सेंट्रलने रोटरीच्या सार्वजनिक प्रतिमेचा प्रभावी प्रचार केला. समाजसेवेच्या कार्यात रोटरी कसे पुढे आहे, विविध सेवा प्रकल्पांचे महत्त्व, आणि रोटरीची मूल्ये या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात या कार्यक्रमाने मोलाची भूमिका बजावली.
कीर्तन आणि भजन यासारख्या लोकप्रिय माध्यमांचा वापर करून रोटरीच्या मूल्यांची प्रसार-प्रसिद्धी करणारा हा अभिनव प्रयोग निश्चितच अनुकरणीय ठरला.
रो रविंद्र बनकर
डिस्ट्रिक्ट डायरेक्टर पब्लिक इमेज


