पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- २१६,विधानसभा अकोले अनुसूचित जमाती मतदारसंघातून प्रवरा, मुळा, आढळा खोऱ्यासह आदिवासीबहुल दुर्गम ग्रामीण भागांसह अकोले मतदारसंघात समाविष्ट संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या भूरचनेनुसार यापुढे भारतीय जनता पक्षाने अकोले विधानसभा मतदारसंघासाठी नव्याने मंडलनिहाय पाच अध्यक्षांच्या निवडी रविवारी जाहीर केल्या.
भाजपाचे अकोले तालुका निरिक्षक नितिन कापसे यांनी रविवारी दुपारनंतर अकोल्यात भाजप संपर्क कार्यालयात भाजपाचे
तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन या निवडी जाहीर केल्या.
अकोले तालुका निरीक्षक नितिन कापसे यांनी अधिकृत नियुक्तीपत्र सबंधित सर्व ०५ मंडल अध्यक्षांना प्रदान करून त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
अकोले विधानसभा मतदारसंघातून २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून मताधिक्य मिळवून भाजपचे नेते वैभवराव पिचड यांना
निवडून आणण्याची व्यूहरचना यानिमित्त आखण्यात येत आहे.अकोले तालुक्याला पाच अध्यक्ष निवडल्याने भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.तसेच ३०७ बूथ ची जबाबदारी ही पाच अध्यक्ष यांच्यावर सोपविण्यात येणार असल्याने प्रत्येकी ६०ते ६५ बूथांची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.त्यामुळे जन संपर्क वाढण्यास मदत होणार आहे.
तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भाग, संगमनेर तालुक्यातील पठार भागांसह बिगर आदिवासी तीन खोऱ्यातूनच पाच अध्यक्षांना नियुक्त करण्यात आले.
यात प्रमुख अकोले मंडलाचे अध्यक्षपदी राहुल देशमुख, देवठाण-समशेरपूर मंडल अध्यक्षपदी वाल्मिक नवले, कोतूळ मंडल अध्यक्षपदी बाळासाहेब सावंत, राजूर मंडल अध्यक्षपदी दत्तू ढगे व संगमनेर पठार मंडल अध्यक्षपदी संतोष शेळके यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नितिन कापसे यांनी जाहीर केले.
या अध्यक्ष निवडीबद्दल भाजप अनुसूचित जन जाती मोर्चा नवी दिल्ली चे राष्ट्रीय मंत्री मा.आ.वैभवराव पिचड, जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे,मावळते तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव,अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख,अमृतसागर चे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे,तालुका सरचिटणीस मच्छीन्द्र मंडलिक,धनंजय संत, भरत घाणे,नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,उप नगराध्यक्ष शरद नवले, अरुण शेळके,सुनील सारोक्ते,अब्दुल इनामदार,खंडू बाबा वाकचौरे,अमृतसागर चे संचालक आनंदराव वाकचौरे, रमेशराव राक्षे, भाऊसाहेब वाकचौरे, सोमदास पवार, दिनेश शहा,राजेंद्र डावरे,अशोक आवारी, सुशांत वाकचौरे,दगडू हासे,प्रतीक वाकचौरे, महेश काळे,विवेक चौधरी,आदीसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
