पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अकोले महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे सेवा निवृत्त ,प्राध्यापक,कवी,गझलकार प्रा.नंदकुमार मुरलीधर रासने( वय वर्षे ७८) यांचे सोमवारी पहाटे ५ वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सून,जावई, दोन भाऊ,तीन बहिणी,पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अकोले कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.रुपाली दीपक जाधव,नाशिक येथील नेटिव्ही ट्रीट च्या संचालिका रश्मी आकाश अंधारे,पुणे येथील नेक्स्ट वेव्ह चे संचालक राहुल रासने यांचे ते वडील होते. अकोले येथील वैशाली जनरल स्टोर्स चे संचालक भारतसेठ रासने व सुनीलनाना रासने यांचे ते बंधू होते.सुलोचना सुनील कोळपकर,बेबी कासार व शोभा शेटे यांचे ते बंधू होते.
प्रा.नंदकुमार रासने यांच्या वर अकोले येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विविध विभागतील प्राध्यापक,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. रासने वाणिज्य शाखेतील प्राध्यापक , पण त्यांची सारी रसिकता अन् स्वाभाविक रुची मात्र साहित्य, लेखन , वाचन , कला शाखेशी निगडीत होती.
प्रा . रासने यांनी अगस्ती महाविद्यालयाच्या जडणघडणीत स्थापनेपासून मोठे योगदान होते. अत्यंत नम्र ,शांत स्वभाव नर्मविनोद व सर्वांशी सलोख्याचे संबध व संवाद असलेले
प्रा.रासने हे साहित्य विषयक चर्चा, वाचन,कलेमधील कमालीची अभिरुची हे सगळं लक्षात घेता ते कॉमर्स चे शिक्षक , पदवीधर वाटलेच नाही.
