पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी (सचिन लगड)-
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ,आयुष मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत पश्चिम विभागीय सह सुविधा केंद्र, वनस्पती शास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे आणि वनस्पतीशास्त्र विभाग ॲड.एम.एन देशमुख महाविद्यालय राजूर यांचे संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती क्षेत्रातील संधी या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.या परिसंवादाचे उद्घाटन डॉ.शंकरराव मगर,(माजी कुलगुरू बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली )यांच्या शुभहस्ते औषधी वनस्पतीच्या रोपाला पाणी देऊन संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड्. मनोहरराव देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी करून परिसंवाद आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.या परिसंवादाचे समन्वयक डॉ.दिगंबर मोकाट( विभागीय समन्वयक , आ.सी.एफ.सी.वनस्पतीशास्त्र विभाग सा.फुले पुणे विद्यापीठ, पुणे)यांनी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ,आयुष मंत्रालय भारत सरकार या विभागाकडील योजनांची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना विविध औषधी वनस्पतीचे महत्व व फायदे सांगितले.यावेळी २०० औषधी वनस्पतींचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचेही उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले.हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा.के.जे.काकडे यांनी करून दिला. या परिसंवादात तज्ञ मार्गदर्शक डॉ.श्रीपाद महामुनी यांनी आयुर्वेद उपचार पद्धती डॉ.प्रकाश बाविस्कर यांनी औषधी वनस्पती चे उपयोग या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीचे वाटप करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात ॲड.मनोहरराव देशमुख यांनी योग आणि आयुर्वेद या विषयावर विचार व्यक्त केले.तसेच शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लावण्यासाठी सर्व आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उद्घाटनपर भाषणात कुलगुरू डॉ.शंकरराव मगर यांनी औषधी वनस्पती क्षेत्रातील संधी व सरकारी योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. परिसंवादाचे समन्वयक डॉ.मोकाट यांनी औषधी वनस्पती लागवडीविषयी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही दिली.
या कार्यशाळेप्रसंगी डॉ.रमेश भारमल (माजी अधिष्ठाता,नायर हाॅस्पिटल, मुंबई )
सत्यनिकेतन संस्थेचे संचालक एस.टी.येलमामे, विजय पवार, रमाकांत डेरे उपस्थित होते.सदर परिसंवाद यशस्वी करण्यासाठी वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. के.जे.काकडे,डॉ.एल.एल.वाळे, प्रा.व्ही.बी.येलमामे,
डॉ.डी.बी.तांबे, प्रा.उमेश अवसरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा.विनोद येलमामे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.डी.बी.तांबे यांनी केले.राष्ट्रगान गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

