पुण्य वार्ता
प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव) अकोले तालुक्यातील अंबड येथील श्री दत्त दूध संस्थेची ४९ वी सभा संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
सध्या साथीच्या लंपी लकवा अशा अनेक आजाराने संपूर्ण राज्यात थैमान घातले असुन त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे यावेळी अनेक विषयांवर सभासदांनी सादकबाधक चर्चा केली संस्थेने आर्थिक वर्षात काटकसरीने कारभार केला आहे त्यामुळे संस्थेला ‘अ ‘वर्ग मिळाला आहे यावेळी सन २०२३ ते २०२४ या वार्षिक सालात दुध पुरवठा करणार्या सभासंदाचा रोख रक्कम व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले प्रथम क्रमांक श्री सत्यम सुरेश भोर दुतीय क्रमांक संदिप रामनाथ कानवडे तृतीय क्रमांक शांताराम आनंदा भोर चतुर्थ क्रमांक बाळू रामनाथ भोर व पाचवा क्रमांक उत्तम शांताराम कानवडे या उत्पादकांना बक्षीस देण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते गिरजाजी जाधव यांनी संस्थेच्या कामकाजा बाबद समाधान व्यक्त केले मा सरपंच शिवराम भोर यांनी संस्थेला पुढील आर्थिक वर्षात ५० वर्ष पुर्ण होणार आहे त्या बद्दल रौप्यमहोत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी केली संस्थेचे माजी चेअरमन केशवराव मालुंजकर यांनी संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दुध संघाशी सलग्न रहाण्याची सुचना केली तसेच सभासदांना जास्तीत जास्त रिबीट देण्यात यावे अशी मागणी संचालक मंडळाकडे केली सोसायटीचे चेअरमन परीक्षीत भोर यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुध व खाद्याचा इंटरनेट द्वारे मेसेज जाईल अशी मागणी केली संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी गोड होईल यासाठी जास्तीत जास्त रिबीट देण्यात येईल तरी संस्थत अधिक संकलनात वाढ होईल या दृष्टीने संचालक मंडळ प्रामाणिक काम करील अशी ग्वाही दिली या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गावच्या सरपंच रेश्माताई कानवडे उपसरपंच नाथा भोर सदस्य संदीप जाधव दगडू जाधव प्रमोद भोर जेष्ठ नेते गिरजाजी जाधव या सरपंच शिवराम भोर माधवराव भोर तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळचंद भोर मधुकर भोर परिक्षीत भोर कैलास कानवडे भास्कर कानवडे रमेश जाधव मा सरपंच दत्तू जाधव सुधीर कानवडे तुकाराम भोर रामचंद्र हासे विष्णू जाधव कोंडीबा भोर सुनिल बोर्हाडे तसेच संस्थेचे चेअरमन व्हाईसचेअरमन संचालक मंडळ सचिव सत्यम भोर उपस्थित होते प्रास्ताविक संदिप भोर यांनी केले तर शेवटी आभार सत्यम भोर यांनी मानले.
