पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द :संजय गोपाळे )
संगमनेर तालुक्यातील निमज परिसरातील भोकनळ वस्ती येथे दोन मोटरसायकलच्या अपघातात 55 वर्षीय महिला अपघातात ठार झाल्याची घटना घडली आहे.
दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास निमज येथील भोकनळ वस्ती येथे दोन मोटार सायकल समोरासमोर धडक झाल्याने अहिल्याबाई देविदास शिरसागर (वय 55 ) ता. जुन्नर ही महिला आपल्या पतीसोबत मोटर सायकल वरून जात असताना समोरून पेमगिरी वरून येणाऱ्या दोन युवकांच्या मोटर सायकलने समोरासमोर धडक झाल्याने अहिल्याबाई शिरसागर या जागेवर ठार झाल्या त्यांना इतर तीन जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतुन संगमनेर ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी या ठिकाणी पाठवण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच अहिल्याबाईंचे पती शिरसागर यांना देखील गंबीर मार लागल्याने त्यांना व पेमगिरी येथील शिवाजी गपले( वय 35 ), व अमोल गुळवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची खबर कळताच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. एस.वायाळ,व महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
