पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- विद्यार्थिनींनी आपल्या योग्य व सकस आहारावर लक्ष केंद्रित करून आरोग्याची काळजी घ्यावी.असे प्रतिपादन डॉ.रवींद्र डावरे यांनी केले.
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल,रोटरी इन्ट्रॅक्ट क्लब ऑफ अगस्ति विद्यालय अकोले आणि अकोले ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने अगस्ति विद्यालयातील १५० विद्यार्थिनींची रक्त गट,ऍनिमिया साठी एचपीएलसी,
,थायरॉइड,एचबीए1सी इत्यादी मोफत तपासणी शिबीर आयोजित केले होते.यावेळी डॉ. डावरे विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाळासाहेब मेहेत्रे होते.यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख,उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, माजी अध्यक्ष सचिन शेटे, माजी प्राचार्य संतोष कचरे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.लोहरे, टेक्निशियन महेश वलवे,अनिल गुळवे,मदतनिस कांडेकर, वैशाली ओहळ
संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी, प्राचार्य शिवाजीराव धुमाळ,घनश्याम माने,निशांत बिबवे, सौ भारती गिरी मॅडम, सौ आर .डी. नवले मॅडम, इन्ट्रॅक्ट क्लब ची अध्यक्ष पलक आवारी,सेक्रेटरी स्वराली आभाळे,खजिनदार सृष्टी नाईकवाडी आदीसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

डॉ.रवींद्र डावरे पुढे म्हणाले की, रक्तगट चार प्रकारचे असून ए,बी, एबी आणि ओ असे असून त्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे उप प्रकार असतात.एखाद्या गरजू व्यक्तीला रक्त देताना त्याला लागू होणारे रक्त दिले जाते.ओ रक्तगट हा सर्वांना लागू होतो.वयाच्या १८ व्या वर्षानंतर आपण रक्तदान करू शकतो.
ऍनिमिया हा सर्व मुलींमध्ये कॉमन आजार आहे.निकृष्ट आहार,अवेळी जेवण,अनियमित मासिक पाळी,यामुळे रक्तक्षयाचे प्रमाण मुलींमध्ये जास्त असते.त्यामुळे चिडचिड होणे,चक्कर येणे,थकवा वाटणे,छातीत धडधडणे,अभ्यासात लक्ष न लागणे या सारखे लक्षणे दिसून येतात.यासाठी सकस आहार,हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.ऍनिमिया हे चार प्रकारचे असून त्या त्या कारणामुळे कमतरतेनुसार असतात.त्यासाठी एचपीएलसी टेस्ट घेण्यात येते.

रक्तातील साखरेचे निदान करण्यासाठी एचबीए1सी ही टेस्ट घेतली जाते, तर आपल्या शरीराचे चक्र नियमित करणाऱ्या थायरॉईड ग्रंथी साठी टी-3,टी-4 आणि टी एस एच या तपासण्या केल्या जातात. ही एक प्रकारची ग्रंथी असून मानेच्या वरच्या बाजूला तिचे काम चालू असते.त्यामुळे सर्वांनी योग्य व सकस आहार घेऊन आपले आरोग्याची काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ.बाळासाहेब मेहेत्रे म्हणाले की, शासकीय ग्रामीण रुग्णालयात अनेक चांगल्या सुविधा असून त्याचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा,ग्रामीण रुग्णालयातील सर्व सुविधा नागरिकांरापर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे.रोटरी क्लब चे उपक्रम अतिशय चांगले व स्तुत्य असून आमचे त्यांना नेहमीच सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.

रोटरी क्लब चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी या उपक्रमाची माहिती देत इन्ट्रॅक्ट क्लब द्वारे शाळेत अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये सामजिक बांधिलकी जपण्याचे काम होणार आहे.या सर्व तपासणी उपक्रमामध्ये ग्रामीण
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाळासाहेब मेहेत्रे यांचे व त्यांच्या टीमचे फार मोठे योगदान आहे, त्यांच्या सारखे वैद्यकीय अधिकारी मिळणे ही बाब तालुक्यासाठी भूषणावह बाब आहे.रोटरी क्लब सदैव त्यांचा ऋणी राहील. यापुढे त्यांच्या सहकार्याने डायबेटीस तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. अगस्ति विद्यालयाने अतिशय सुंदर नियोजन करून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्यांचेही आभार मानतो.
सूत्रसंचालन आदर्श शिक्षक घनश्याम माने यांनी केले.
चौकट-खाजगी दवाखान्यात या सर्व तपासणी करण्यासाठी मोठा खर्च आला असता, परंतु रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालय यांनी ही तपासणी मोफत करून दिली, त्याचा लाभ आमच्या विद्यार्थिनींना निश्चित होईल, संस्थेच्या वतीने आम्ही या उपक्रमाचे स्वागत करतो
सतीश नाईकवाडी,
कार्याध्यक्ष,अगस्ति एज्युकेशन सोसायटी,अकोले

