पुण्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
दि.२८ जुन २०२५, शनिवार रोजी पोदार प्रेप संगमनेर येथे ‘इंटरनॅशनल मड डे’ चे औचित्य साधून ‘योग इन मड’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या
प्राचार्या आदरणीय सौ. मिनाक्षी मिश्रा यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर,
पालक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्गाने प्रेक्षणीय उपस्थिती दर्शविली.
या उपक्रमात पालकवर्ग व विद्यार्थ्यांसाठी
‘योग मुद्रा विथ मडी हॅंड्स’, ‘मडी फिट योगा’, ‘मड बेकरी’,’मड पेंटिंग मास्टरपीस’,’मडी-बडीस् योगा’, ‘रस्सीखेच’,
‘फुटबॉल’ अशा विविध रंजक आणि निसर्गाशी जोडणाऱ्या रोमहर्षक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
पोदार प्रेप च्या
मुख्याध्यापिका सौ. सोनल शुक्ला यांनी उपस्थित पालक वर्गाचे शब्द सुमनांनी स्वागत करत कार्यक्रमास उपस्थिती दर्शविल्याबद्द सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
सर्व विद्यार्थी व पालक वर्गाने आपला उत्साही सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण केले व कार्यक्रमाचा उत्स्फूर्तपणे आनंद लुटला.
पालकांनी विविध माध्यमांतून आयोजित कार्यक्रमा संदर्भात आपले अभिप्राय नोंदवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्रशासकिय अधिकारी श्री. सागर नेरपगार, शिक्षकवृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

