पुन्य वार्ता
अकोले,प्रतिनिधी:
अकोले तालुका धामणगाव पाट येथे सालाबादप्रमाणे जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जय मल्हार प्रतिष्ठानचे सल्लागार मार्गदर्शक कैलास राऊत मामा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रा उत्सवात भजन, कीर्तन, महाप्रसाद, कुस्त्यांचे मैदान, पालखीसोहळा आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास अकोले, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, आळेफाटा आणि नवी मुंबई येथील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सोहळ्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी नियोजित वेळी उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
