पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी:
राज्यातील आश्रम शाळेच्या दर्जेदार इमारतींच्या सोबतच शासकीय आश्रम शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेने परिपुर्ण होण्यासाठी प्रयत्न करून आश्रम शाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ.डॉ. किरण लहामटे यांनी केले.
आ.डॉ. किरण लहामटे यांनी शुक्रवारी दिवसासह रात्री घाटघर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत चक्क भाजी पोळी जेवणाचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या बेडवर मुक्काम केल्याने आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच दिसून आला. आदिवासी खेड्यापाड्यातून आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शहरी भागासह आदिवासी परिसरात शासकीय आश्रम शाळेची निर्मिती करण्यात आली आहे.तर महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विभागा अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा आणि वस्तीगृहातून आदिवासी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा आणि दर्जात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु अनेकदा शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा सह जेवणाच्या समस्या नेहमीच भेडसावत असतात त्या अनुषंगाने खासदार, आमदार आणि शासनातील अधिकारी शासकीय आश्रम शाळेतील शिक्षण, आरोग्य, सोयी सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात की नाही याबाबत सदैव तपासणी करत असते. पण मात्र अद्याप कधीही आमदार, खासदार नेते आणि आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, उप आयुक्त व वरिष्ठ अधिकारी कधीही आश्रम शाळेत मुक्कामी थांबल्याचे दिसून आले नाही.परंतु राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांच्या संकल्पनेतुन आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृहात “संवाद चिमुकल्यांशी” या अभियाना अंतर्गत घाटघर शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आ.डॉ. किरण लहामटे यांनी संवाद सांधत येणाऱ्या अडचणी समजुन घेत शौचालय, स्नान गृह,स्वांयपाक गृह,अन्नधान्य साठा,केळी,अंडी,भाजी पाला,पिण्याचे पाणी, वह्या- पुस्तके, विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या निवासस्थाने, गणवेश, तसेच आंथरुण- पांघरूणाची सोई सुविधांची पाहणी केली,तर देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री कोण, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे,कळसूबाई शिखराची उंची असे विविध प्रश्न घाटघर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विचारले असता विद्यार्थ्यांनीही न चुकता आ.डॉ. लहामटेच्या प्रश्नांना न चुकता उत्तरे दिल्याने आ. लहामटे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तोंडभरून कौतुक केले.आणि घाटघर शासकीय आश्रम शाळेत अन्न शिजवण्याची प्रत्यक्ष पाहणी करत स्वतः आ. डॉ.लहामटेंनी आश्रम शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी समवेत खाली बसून जेवणाचा आस्वाद घेतला.आणि विद्यार्थी झोपत असलेल्या बेड वरच झोप घेत विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेतच मुक्काम ठोकला.यावेळी घाटघर शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अभय वाघ, अधीक्षक रियाज दुंगे,कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

