पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- सद्यस्थितीत जागतिक पातळीवर 'भारतीय रुपया' या चलनाचा वापर करत आहेत ही बाब भारताचे महत्त्व अधोरेखित करीत असून पुढील १० वर्ष भारतासाठी सुवर्णकाळ असेल.भारत जगामध्ये महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे
प्रत्येकाने स्वतःच्या आर्थिक धेय्यपूर्तीसाठी म्युच्युअल फंड मध्ये sip द्वारे गुंतवणूक करावी. त्याचे अनेक फायदे असून आपण श्रमाने,कष्टाने कमविललेल्या पैशाला यात चांगला परतावा. मिळतो .महागाई चा विचार करता म्युच्युअल फंड हे अतिशय योग्य गुंतवणूक पर्याय आहे असे प्रतिपादन
निप्पोन म्युच्युल फंड चे क्लस्टर्ड हेड विक्रांत मोरे यांनी केले.
रोटरी क्लब अकोले सेंट्रल व डॉ. गणेश नवले संचलित श्री वेल्थ ,अकोले यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ” चला अर्थ साक्षर होऊ या ” उपक्रर्मांतर्गत ‘अर्थसाक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी निप्पोन म्युच्युल फंड चे क्लस्टर्ड हेड विक्रांत मोरे हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
श्री मोरे यांनी
विमा म्हणजे संरक्षण,
बचतीवर व्याज आणि गुंतवणूकीवर परतावा या संकल्पना यावेळी सोप्या भाषेत समजावुन सांगितल्या.
कमी किमतीत टर्म इन्शुरन्स, पुरेसा आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा, वाहन विमा आणि इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना धेय्य ठरऊन सल्लागारांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते असे ते म्हणाले.
यावेळी श्री मोरे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले. ह भ प दीपक महाराज देशमुख यांनी विचारलेल्या म्युच्युअल फंड ची विश्वासहर्ता या प्रश्नावर बोलताना श्री.मोरे यांनी सांगितले की, ज्या प्रमाणे रिझर्व्ह बँक ही संस्था बँकांना मार्गदर्शक असते .त्याचप्रमाणे SEBI ,AMFI या राष्ट्रीय स्तरावरील संस्था म्युच्युअल फंड ला मार्गदर्शक , नियंत्रक असतात.
प्रास्ताविक करताना डॉ गणेश नवले म्हणाले की, चला अर्थसाक्षर होऊ या हे ब्रीद घेऊन आपल्या समाजामधे अर्थसाक्षरता निर्माण करण्याचे अविरत कार्य श्री वेल्थ द्वारे चालू आहे
फसव्या योजनेपासून आपले व समाजाचे संरक्षण व्हावे, प्रत्येक कुटुंब अर्थसाक्षर व आत्मनिर्भर व्हावे कुटुंबाचा गावाचा राज्याचा देशाचा विकास व्हावा यासाठी श्री वेल्थ ची सर्व टीम कार्यरत आहे.आज सर्व नागरिक अर्थसाक्षर झाल्यास भारत देश सामर्थ्यवान व संपन्न होईल यात शंका नाही.
स्वागत व आभार प्रदर्शन ह.भ.प. दीपक महाराज देशमुख यांनी केले .
यावेळी
रोटरी क्लब सेंट्रल चे पदाधिकारी, सदस्य, अकोलेतील प्राध्यापक ,
व्यावसायिक ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी स्नेह भोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री वेल्थ चे सर्व सहकारी व रोटरी क्लब चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.



