पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
मॉडर्न हायस्कूलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न
आज विद्यालयात विविध उपक्रमांद्वारे महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी विविध विद्यार्थ्यांनी गीते, कथा,कविता,भाषण याचे सादरीकरण करण्यात आले..
या कार्यक्रमासाठी हिंदसेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष दिलीप भाई शहा साहेब मॉडर्न हायस्कूलचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी साहेब प्रशासकीय अधिकारी आयाज शेख सर माजी प्राचार्य संतोष कचरे सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम उपप्राचार्य जोंधळे सर पर्यवेक्षक जोशी सर जंगम सर शालिग्राम सर आदी मान्यवर उपस्थित होते..
मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पदव्या व प्रगल्भ बुद्धिमत्ता याची माहिती दिली तसेच प्रशासकीय अधिकारी अयाज शेख सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा प्रवास सांगितला व कचरे सरांनी कथेद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा परिचय करून दिला. तसेच पर्यवेक्षक जोशी सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील ग्रंथसंपदेचे वर्णन करू वाचनाचे महत्त्व सांगितले. व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. विविध कार्यक्रमांद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंदात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जोशी सर यांनी केले
