पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य योगा स्पोर्ट असोसिएशन, बृहन्महाराष्ट्र योगा परिषद व अहमदनगर योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहमदनगर जिल्हा योगासन चँपियनशिप स्पर्धेत तालुक्यातील वीरगाव येथील आननगड शैक्षणिक संकुलाच्या मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी योगेश माने हिने जिल्हास्तरीय *योगासन स्पर्धेत सुवर्ण पदकपटकविले आहे.ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या राजस्तरीय योगासन स्पर्धेत तिची निवड झाली आहे.
मालपाणी लाँस संगमनेर येथे आयोजित या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिध्द उद्योगपती व शिक्षणतज्ज्ञ संजय मालपाणी यांच्या हस्ते संपन्न झाले. वैष्णवी च्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे ,सचिव डॉ अनिल रहाणे, सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे प्राचार्या पल्लवी फलके यांनी अभिनंदन केले व पुदील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

