पुण्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील जि, प, प्राथमिक शाळा धांदरफळ खुर्द , (माणकेश्वर मळा) येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतिने चिमुकल्यांना शालेय साहित्याचे( दप्तर वही,पेन ) वाटप करण्यात आले.
या वेळी
चिमुकल्यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ दरवर्षी 10 वी 12 वी या वर्गात विशेष गुण प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करीत असतो, तर चिमुकल्यांना ही दप्तर ,वह्या, पेन या शालेय साहित्याचे वाटपही या वेळी केले जाते, धार्मिक व सामाजीक कार्यातही पत्रकार संघाचा मोठा वाटा असून यात गरजूंना रेनकोट छत्री,व उबदार अशा साहित्याचेही वाटप केले जाते, नुकतेच पंढरपूर येथे पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ, विश्वासराव आरोटे व पत्रकारांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना याही वर्षी एक हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले, दरवर्षी 1 लाख वह्यांचे वाटप केले जात असून उपक्रमाचे हे 21वे वर्ष आहे,यातुन पत्रकारांचा कोणताही राजकीय हेतू नसून कोणताही पत्रकार निवडणूक लढवीत नाही, तर निस्वार्थीपणे संपूर्ण महाराष्ट्र व राज्याबाहेर देखील हा उपक्रम पत्रकार अत्यंत उत्साहाने राबवित असल्याची माहिती राज्य सरचिटणीस डॉ, विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणातून दिली
संगमनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष,संजय गोपाळे, यांनी आपल्या भाषणात माणकेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका ,शिक्षक, हे शिस्तप्रिय असून त्यांच्या हातून या चिमुकल्यामधून आदर्श अशी भावी पिढी निर्माण होईल अशी ग्वाही दिली
, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अनिल नागणे, यांनी मराठी माध्यमातील शाळा याच खऱ्या अर्थाने विद्यार्थाना प्रगतीकडे नेतील असे सांगितले, केंद्रप्रमुख आवारी, पाट बंधारे विभागाचे अभियंता रजनीकांत कवडे,सरपंच लताताई खताळ,उपसरपंच संदीप ठोंबरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गोडसे,ग्राम. सदस्य शरद कोकणे, संगीता गोडसे, राजेंद्र खताळ, बाळासाहेब गडाख,अमोल खताळ, मुख्याध्यापक सुरेखा कर्पे, क्रीडा शिक्षक बाळासाहेब चव्हाण जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ काळे,पत्रकार संघाचे संगमनेर तालुका अध्यक्ष,संजयजी गोपाळे उपाध्यक्ष स्वानंद जगताप,अकोले तालुका उपाध्यक्ष अशोकराव शेळके, सी न्युजचे प्रतिनिधीनितीन कोकणे,गोरक्ष नेहे,सोसायटीचे चेअरमन ,मारुती काळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी वृक्षlरोपन करून वृक्ष रोपणाचे महत्व विषद केले तर पत्रकार संघाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले, तर राजन शिंदे यांनी गरीब विद्यार्थ्यांना गणवेशासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे घोषित केले, पत्रकार व ग्रामस्थ , पालक मोठया संख्येने या वेळी उपस्थित होते.



