पुण्य वार्ता
प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव) अकोले तालुक्यातील इंदोरी येथील प्रवरा विद्यालयातील इयत्ता १० मधील १९९५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहसंमेल्लन गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात साई लॉन्स इंदोरी फाटा येथे नुकताच साजरा करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या विद्यार्थ्यी विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात आले त्यानंतर जगाचा कायमचा निरोप घेतलेल्या मित्रांना जाग्यावर स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली मागील वर्षी अनुपस्थित असलेल्या मित्र मैत्रिणींनी आपली ओळख उपस्थित मित्र मैत्रिणींना करून दिली नंतर विरंगुळा म्हणून हाऊजी हा खेळ खेळून त्या मध्ये प्रथम क्रमांक पासून तीन नंबर क्रमांक यांना कॅडबरी चॉकलेटचे बक्षीस देण्यात आले या खेळात सर्व उपस्थित मित्र मैत्रिणींनी सहभाग नोंदविला होता यावेळी शिर्डी येथील सन अँड सेंन्ड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या शिवनाथ जाधव या साईभक्त मित्राने सर्वांना साईबाबाची उदी व महाप्रसाद वाटप केला कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांचा एकत्रित फोटो काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी पुरूष मंडळींची लक्षणीय उपस्थिती होती महिला मैत्रिणी यांनी भाऊरायांना ओवाळणीचा दिवस असल्याने त्यांना कार्यक्रम ठिकाणी येता आले नाही त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या गिताप्रमाणे मित्र अडी अडचणीत सापडला तर त्याला मदत होईल तसेच सुख दुःखात सहभागी होऊन त्याला सपोर्ट मिळेल हा उद्देश मनात ठेवून नियोजन कमीटीने या कार्यक्रमाचे दरवर्षी नियोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे
या गोड कार्यक्रमासाठी गुलाब मालुंजकर केशव मालुंजकर शिवनाथ जाधव अशोक चासकर बाबाजी भोर बाळासाहेब भोर विश्वास भोर पंढरीनाथ भोर जालिंदर चव्हाणके बाळू भोर संपत जाधव सुनील पाचपुते विलास मोरे लक्ष्मण नवले विवेक हासे संतोष पाचपुते रामनाथ पथवे मारुती भुतांबरे किसन पथवे भिका भोर मोहन नवले संतोष नवले दत्तू जाधव अरुण कानवडे नंदा मालुंजकर भीमा भोर सुप्रिया नवले विजया भोर मनीषा नवले उज्वला कुमकर मनीषा देशमुख मधुमती देशमुख आदी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विवेक हासे यांनी केले तर शेवटी मोहन नवले यांनी सर्वांचे आभार मानले.


