पुण्यवार्ता
प्रतिनिधी (श्री दत्तू जाधव):-अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे महा मधपालक असोसिएशन यांच्या विद्यमाने आधुनिक मधमाशीपालन तांत्रिक मार्गदर्शन समुपदेशन व जनजागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली या कार्यक्रमास भंडारदरा गावचे सरपंच दिलीप भांगरे उपसरपंच गंगाराम भागा इदे, महिला ग्राम संघाचे अध्यक्ष ,महा मधपालक असोसिएशनचे अध्यक्ष राजू कानवडे तसेच RSETI,KVIC मास्टर ट्रेनर दत्तात्रय ताले ,बायफ संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण व मधपेटी घेतलेले मधपाळ व ग्रामस्थ उपस्थित होते असोसिएशन चे मुख्य उद्दिष्ट सभासद नोंदणी मधमाशी उपयुक्त पिके व वृक्ष लागवड मार्गदर्शन मध उद्योगातील आधुनिक तंत्राचे प्रात्यक्षिक मधाचे गुणवत्तापूर्वक उत्पादन मार्गदर्शन मधउद्योग समस्या निवारण व उपाय योजना मार्गदर्शन मधपाळ सुरक्षा विमा मार्गदर्शन मध पॅकिंग विक्री मार्गदर्शन मध बाय प्रॉडक्ट मार्गदर्शन याविषयी सविस्तर माहिती दिली मधमाशीपालनातील प्रशिक्षण व मार्गदर्शन देणारी मुख्य शासकीय यंत्रणा म्हणजे खादी ग्रामोद्योग या यंत्रणेकडे मधउद्योग प्रशिक्षण दिल्यानंतर वारंवार तांत्रिक मार्गदर्शन करण्याकरता मधुशेत्रीक आहे परंतु त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती व संख्या देखील कमी आहे तसेच कृषी विभाग वन विभाग इतर विभाग सेवाभावी संस्था तसेच इतर विभागामार्फत वेगवेगळे योजनांतून मधपेटा वाटप केल्या जातात प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते मात्र त्यानंतर तांत्रिक अडचणी मार्गदर्शन न मिळाल्यामुळे हा व्यवसाय करणारे लोक अडचणी येतात या अडचणी सोडवण्यासाठी संघटना प्रामाणिक प्रयत्न करते गावात मधपाळ संघ स्थापन करून त्या संघाचे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मिळालेल्या पेट्या त्या संघात नोंदणी ठेवून जे काम करतात त्यांना पेट्यांचा लाभ मिळेल आणि जे रिकामे पेट्या घरात ठेवतात त्यांच्याकडून ग्रामसंग पुन्हा घेऊन इच्छुक मधपाळास त्या पटांचे वाटप करेल म्हणजेच शासनाने रोजगार निर्मिती करण्यासाठी दिलेला पैसा योग्य कारणी लागेल संघटनेचे सभासद होण्याचे उपस्थित मधपाळांना आवाहन राजू कानवडे यांनी केले दत्ता ताले यांनी डॉक्टर पंजाबराव जैविक शेती मिशन कृषी संलग्न व्यवसाय तसेच वैयक्तिक व समूह शासकीय प्रोजेक्ट बद्दल मार्गदर्शन मधु क्रांती पोर्टल मधपाळ नोंदणी मार्गदर्शन मधमाशी व्हायरस व आजार उपचार याबद्दल माहिती दिली सदर कार्यशाळेचा लाभ जवळपास 40 ते 50 महिला व शेतकरी यांनी घेतला गावचे सरपंच दिलीप भांगरे यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले
