पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मानव जातीसाठी महान कार्य केले असून दुःखीत,वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.त्यांना डोक्यावर घेऊन नाचू नका तर त्यांचे विचार डोक्यात घ्यावे असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक गंगाराम लेंडे सर यांनी केले.
अकोले शहरातील निळवंडे वसाहती मध्ये महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.लेंडे मार्गदर्शन करताना बोलत होते. छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी साहेबराव लांडगे, श्री.पिचड सर,विकास साबळे सर,वन अधिकारी भास्कर मुठे, पोलीस हवालदार अनिल भांगरे, पंचायत समितीचे सेवा निवृत्त कर्मचारी सीताराम पांडे,बबनराव बांबेरे सर,सखाराम भांगरे,जलसंपदा चे सतीश गांगुर्डे, सौ.सोनाली सतीश गांगुर्डे,ठकाजीराव डगळे,श्री पारधी,प्रदीप लेंडे आदीसह अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी गंगाराम लेंडे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शेवटी भास्कर मुठे यांनी सर्वांचे आभार मानले.
