पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी अहिल्यानगरच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
यावर्षी अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव पाट येथे कार्यरत करत असलेल्या श्रीमती राजकमल देवचंद नवले/ पवार यांना नुकताच नारी शक्ती पुरस्कार ज्येष्ठ कवी, साहित्यिक अशोक नायगावकर यांचे हस्ते अहिल्यानगर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्य नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पंचवीस वर्षापासून राजकमल पवार शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी राजुर, औरंगपूर, अशा शाळांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव पाट येथे कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सहशालेय उपक्रमांबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी त्या करून घेत असतात. विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त व आनंददायी शिक्षणासाठी त्यांनी शाळांतून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर त्या प्रभावीपणे करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी अहिल्यानगरच्या वतीने नुकताच त्यांना नारीशक्ती अहिल्यानगर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गणपत सहाणे, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब तोरमड, भगवान सहाणे, बाळासाहेब सहाणे, गोरक्ष देशमुख, अनिल पवार तसेच तालुक्यातील महिला शिक्षिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
