पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
साठवलेल्या पाण्यात होते डेंग्यू पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ! डेंग्यूचा प्रसार टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक
डेंग्यू ताप हा विशिष्ट्य विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी ८ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यामुळे कोणतेही साठवलेले पाणी आठ दिवसापेक्षा जास्त ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे, जिल्ह्यातील बऱ्याच गावामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने नागरिकांचा पाणी साठविण्याकडे कल दिसून येत आहे. अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पत्ती होवू शकते. या डासांची उत्पत्ती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असते. लोक सहभागाशिवाय या आजाराचे शक्य नाही.
आरोग्य सेवक दीपक वसंत दातीर उपकेंद्र हिवरगाव

